वक्फ मंडळाच्या ७० टक्के भूमीवर अतिक्रमण ! – अल्पसंख्यांक विभाग

भूमी खरेदी-विक्रीतील अपहाराच्या वाढत्या घटना पहाता सरकारने वक्फ मंडळाला दिले जाणारे अनुदान त्वरित बंद करावे ! – संपादक 

मुंबई, २२ मार्च (वार्ता.) – वक्फ मंडळाच्या एकूण भूमीपैकी ७० टक्के भूमीवर अतिक्रमण झाले असल्याची धक्कादायक माहिती अल्पसंख्यांक विभागाकडून देण्यात आली आहे. शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे आणि आमदार डॉ. (सौ.) मनीषा कायंदे यांनी ‘महसूल विभागाच्या अधिकार्‍यांच्या संगनमताने भूमाफियांनी वक्फ मंडळाच्या भूमीवर अतिक्रमण केले आहे’, असा तारांकित प्रश्न २२ मार्च या दिवशी विधान परिषदेत उपस्थित केला होता. त्यावर अल्पसंख्यांक विभागाने दिलेल्या उत्तरात हे अंशत: खरे असल्याचे मान्य केले.