पुणे – ‘संभाजी महाराज यांचे बलीदान, म्हणजे हिंदुस्थानच्या अस्तित्वाला असलेले आव्हान आहे. आज संभाजी महाराज किंवा औरंगजेब अस्तित्वात नाहीत; पण पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्या रूपाने औरंगजेब अजूनही अस्तित्वात आहे. देशातील गावागावांमध्ये इस्लाम धर्म आहे. हाच आपला खरा शत्रू आहे. संभाजी महाराज यांनी मरेपर्यंत इस्लाम धर्म पत्करला नाही. त्यांच्यात ती आग आणि धमक होती. त्यामुळे आता हिंदु समाजानेही तितक्याच पोटतिडकीने इस्लामला प्रत्युत्तर दिले पाहिजे’, असे मत पू. संभाजी भिडेगुरुजी यांनी व्यक्त केले. ते सध्या पुण्यातील शिरूर तालुक्याच्या दौर्यावर आहेत. या वेळी त्यांनी वढू बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले.
पू. भिडेगुरुजी पुढे म्हणाले, ‘‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा बलीदान मास आपण पाळत आहोत. त्यामध्ये हिंदुस्थानच्या अस्तित्वाचे आव्हान दडलेले आहे. केवळ संभाजी महाराज यांच्याशी शत्रुत्व होते; म्हणून औरंगजेबाने त्यांना तुकडे-तुकडे करून मारले नाही, तर यामागे इस्लाम धर्माविषयी औरंगजेबाच्या मनात असलेली पोटतिडीक कारणीभूत होती. औरंगजेबाला संपूर्ण भारताचे तुकडे-तुकडे करायचे होते. त्याला हा देश संपवून टाकायचा होता. याच रागातून औरंगजेबाने धर्मवीर संभाजी महाराज यांना मारले.’’