|
अशा प्रकारे खटले न्यायालयात वर्षानुवर्षे प्रलंबित रहात असतील, तर जनतेला न्याय कसा मिळणार ? – संपादक
भीलवाडा (राजस्थान) – येथील ४५ वर्षे बंद असलेले श्री देवनारायण मंदिर उघडण्यात यावे आणि तेथे पूजा करण्याची अनुमती मिळावी, अशी मागणी हिंदूंकडून करण्यात आली आहे. यासाठी १४ मार्च या दिवशी १७ किलोमीटर लांब मोर्चा काढण्यात आला होता. त्यानंतर प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
Hindus took out 17km foot march to open Rajasthan Devnarayan temple https://t.co/H4ZoJoVSxD https://t.co/xubCAWtonL #rajasthannews #bhilwaranews #hindumuslimnews #devnarayantemple
— News track English (@newstrack_eng) March 16, 2022
या मोर्चाचे नेतृत्व सवाईभोज महंत सुरेशदास, नीलकंठ महादेव मंदिराचे महंत दीपकपुरी, मालासेरीचे पुजारी हेमराज पोसवाल आणि देवनारायण संघर्ष समितीचे संयोजक उदयलाल भडाणा यांनी केले. या मोर्चापूर्वी, म्हणजे ११ मार्च या दिवशी गोपालसिंह गुर्जर बस्सी नावाच्या एका तरुणाने या मंदिराचे टाळे तोडले हेते. यानंतर त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता.
काय आहे प्रकरण ?वर्ष १९७७ मध्ये या मंदिराची भूमी वादग्रस्त असल्यावरून हे मंदिर न्यायालयाकडून बंद करण्यात आले होते. त्याविषयी खटला चालू होता. पोलिसांचे म्हणणे आहे की, या मंदिराच्या भूमीच्या काही भागावर मुसलमानांनी त्यांचा अधिकार असल्याचा दावा आहे. हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. |