आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्याला यश
सातारा, १४ मार्च (वार्ता.) – कोयना धरणाच्या फुगवट्यामधील शिवसागर जलाशयात पाण्यातील जल पर्यटन (वॉटर स्पोर्ट्स) चालू करण्यासाठी राज्यशासनाकडून मान्यता देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये याची घोषणा केली. सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्याला यश आले असून भविष्यात कास पठार आणि शिवसागर जलाशय परिसरातील पर्यटनवाढीस चालना मिळणार आहे.