ईश्वरपूर, सांगली येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. राजाराम नरुटे यांचे छायाचित्र पाहून कु. मधुरा भोसले यांना जाणवलेली आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये !

गुरुवार, ३ मार्च २०२२ या दिवशीच्या दैनिक ‘सनातन प्रभात’च्या गोवा आवृत्तीमध्ये मी सनातनचे साधक ६४ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. शंकर नरुटे यांचे वडील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. राजाराम नरुटे यांचे वृत्त न वाचता केवळ त्यांचे छायाचित्र पाहिले. तेव्हा मला पुढील सूत्रे जाणवली. ही सूत्रे श्री. शंकर नरुटेदादा यांना मी सांगितल्यावर त्यांनी सांगितलेली सूत्रे कंसात दिली आहेत.

श्री. राजाराम नरुटे
श्री. शंकर नरुटे

१. मुखावर श्री विठ्ठलाप्रतीचा भोळाभाव जाणवणे

त्यांच्या मुखावर श्री विठ्ठलाप्रतीचा भोळाभाव जाणवत होता. त्यामुळे त्यांच्या वयाच्या तुलनेत त्यांचा तोंडवळा पुष्कळ निरागस आणि निरामय झाल्याचे जाणवत होते.

२. लहान मुलांप्रमाणे मन निर्मळ असल्याने आनंद जाणवणे

त्यांचे मन लहान मुलांच्या मनाप्रमाणे निर्मळ असल्यामुळे त्यांच्याकडून पुष्कळ प्रमाणात आनंदाच्या लहरींचे प्रक्षेपण होत होते.

कु. मधुरा भोसले

३. श्री. नरुटेकाकांचे सत्काराचे छायाचित्र पहात असतांना त्यांचा सत्कार साक्षात् श्री विठ्ठलानेच केल्याचे जाणवणे आणि नंतर श्री. शंकरदादा यांच्याकडून त्याचा कार्यकारणभाव उमजणे

त्यांच्या सत्काराचे छायाचित्र पहात असतांना मला असे जाणवले की, ईश्वरपूर, सांगली येथील सनातनचे साधक ‘श्री. राजाराम मोरे यांच्या माध्यमातून पंढरपूरच्या श्री विठ्ठलानेच श्री. नरुटेकाकांचा सत्कार केला आहे.’ (श्री. राजाराम मोरेकाका हे ही वारकरी असल्यामुळे मधुराताईंना त्यांच्या माध्यमातून श्री विठ्ठलानेच श्री. नरुटेकाका यांचा सत्कार केल्याचे जाणवले, असे मला वाटते. – श्री. शंकर नरुटे)

४. श्री विठ्ठल श्री. नरुटेकाकांच्या भोळ्याभावाने अत्यंत प्रसन्न झाल्याने तो श्री. नरुटेकाकांच्या घरी कायम वास करणार असल्याचे त्याने सूक्ष्मातून सांगणे

या सत्कार सोहळ्याच्या वेळी श्री विठ्ठलाने श्री. नरुटेकाका यांना सूक्ष्मातून सांगितले, ‘‘मी श्री. नरुटे यांच्या भोळ्याभावाने अत्यंत प्रसन्न झालेलो आहे. त्यामुळे आता त्यांना वारी करून पंढरपूरला येण्याची आवश्यकता नाही. मी ईश्वरपूर येथे तुमच्या घरी कायम वास करणार आहे’’, असे त्याने मला सूक्ष्मातून सांगितले.

५. श्री. नरुटेकाकांच्या अस्तित्वामुळे स्थळ आणि वातावरण यांची सतत शुद्धी होत असल्याचे श्री विठ्ठलाने सांगणे

श्री. नरुटेकाकांकडून सतत वातावरणात भक्तीमय चैतन्याच्या लहरींचे प्रक्षेपण झाल्यामुळे त्यांच्या भोवती निळसर रंगाचे महर्लाेकाचे वायुमंडल सूक्ष्मातून निर्माण झाल्याचे जाणवले. ‘त्यामुळे श्री. नरुटेकाकांच्या अस्तित्वामुळे स्थळ आणि वातावरण यांची सतत शुद्धी होते’, असे श्री विठ्ठलाने मला सांगितले.

६. श्री. नरुटेकाकांची आंतरिक साधना चालू असल्यामुळे त्यांनी आता कर्मकांडांतर्गत वारी करून प्रत्यक्ष पंढरपूरला जाण्याची आवश्यकता नसणे

श्री. नरुटेकाकांची आंतरिक साधना भक्तीयोगानुसार चालू झाल्यामुळे त्यांचे श्री विठ्ठलाशी सूक्ष्मातून स्मरणभक्तीच्या माध्यमातून अखंड अनुसंधान चालू असल्याचे जाणवते. त्यामुळे त्यांना आता कर्मकांडांतर्गत प्रत्यक्ष वारी करण्याची आवश्यकता नाही.

७. श्री विठ्ठलाने श्री. नरुटेकाकांच्या संदर्भात उद्गार काढणे

श्री. नरुटेकाकांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्यामुळे त्यांच्या आंतरिक साधनेत गुणात्मक आणि संख्यात्मक वृद्धी झाल्याचे जाणवते. त्यामुळे त्यांची वाटचाल संतपदी चालू झाल्याचे जाणवते. हे सूत्र टंकलेखन केल्यावर श्री विठ्ठलाने मला सूक्ष्मातून सांगितले, ‘‘श्री. नरुटे लवकरात लवकर संत होण्याची मी आतूरतेने वाट पहात आहे.’’

‘भक्त आणि भगवंत यांचे भक्तीमय आध्यात्मिक नाते किती सुंदर असते!’, हे अनुभवण्यास मिळाल्याबद्दल श्रीगुरुचरणी व्यक्त झालेली कृतज्ञता !

श्री. नरुटेकाकांच्या वरील सूत्रांवरून एका विठ्ठलभक्ताची गुणवैशिष्ट्ये आणि आंतरिक साधना कशी असते ? हे सूत्र शिकायला मिळाले. श्री विठ्ठलाने श्री. नरुटेकाकांच्या संदर्भात काढलेल्या उद्गारांतून ‘भगवंताची भक्ताप्रती किती असीम प्रीती आणि कृपा असते!’, हे सूत्र शिकायला मिळाले. श्री. नरुटेकाका त्यांच्या आध्यात्मिक उन्नतीचे संपूर्ण श्रेय श्रीविठ्ठलाच्या चरणी मनोमन अर्पण करून कृतज्ञताभावात असल्याचे जाणवले. श्रीविठ्ठलालासुद्धा श्री. नरुटेकाकारूपी भक्ताने अनेक वर्षे भावपूर्ण साधना करून आध्यात्मिक उन्नती केल्याबद्दल पुष्कळ कौतुक आणि आनंद जाणवत असल्याचे जाणवले. अशा प्रकारे भक्त आणि भगवंत आध्यात्मिक उन्नतीचे श्रेय एकमेकांना देत होते.  यावरून ‘भक्त आणि भगवंत यांचे भक्तीमय आध्यात्मिक नाते किती सुंदर, निरपेक्ष आणि नि:स्वार्थी असते!’, हे अनुभवण्यास मिळाले. त्याचप्रमाणे ‘श्री विठ्ठलाचे भक्त त्याची भक्ती कशी करतात ?’, हे मला शिकायला मिळाले. यासाठी मी परात्पर गुरुमाऊलीच्या पावनचरणी कोटीश: कृतज्ञ आहे.

– कु. मधुरा भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.३.२०२२)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक