रशिया आणि अमेरिका यांचा एकमेकांवर जैविक अन् रासायनिक अस्त्रांवरून आरोप-प्रत्यारोप !

जेन साकी

कीव (युक्रेन) – रशिया युक्रेनवर जैविक किंवा रासायनिक आक्रमण करू शकतो, असे अमेरिकेने म्हटल्यावर रशियाने त्याचे खंडन केले आहे.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान असणार्‍या ‘व्हाईट हाऊस’चे प्रसारमाध्यम सचिव जेन साकी म्हणाले, ‘‘रशियाकडून जैविक किंवा रासायनिक आक्रमण केल्या जाण्याच्या शक्यतेने आम्ही चिंतित आहोत. रशिया एखाचे चुकीचे कारण पुढे करून रासायनिक आक्रमण करू शकतो. त्याने यापूर्वीही असे केले आहे. ‘अमेरिका युक्रेनमधील जैविक आणि रासायनिक प्रयोगशाळामध्ये शस्त्रे बनवत आहे’, असा खोटा दावा रशियाने केला आहे. त्याला चीनही समर्थन देत आहे. हे एक सुनियोजित षड्यंत्र आहे. आम्ही अशा प्रकारचे कुठलेही शस्त्र बनवत नाही आणि ठेवतही नाही.’’