‘काही संत विश्वशांतीसाठी त्यांच्या भक्तांकडून काही लक्ष किंवा काही कोटी नामजप करून घेतात. तेव्हा ते पुढील सूत्रे लक्षात घेतात का ?
१. जप करणार्याची आध्यात्मिक पातळी चांगली असली, तरच त्याच्या जपाचा थोडाफार तरी लाभ होऊ शकतो.
२. विश्वशांतीऐवजी किती संत हिंदु राष्ट्रासाठी नामजप करायला सांगतात ?
३. जप करणारा व्यापक विचारांचा असला पाहिजे; म्हणजे त्याला विश्वशांतीसाठी खरी तळमळ वाटली पाहिजे.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२८.१.२०२२)