‘साधनेत नवीन आलेले काही जण सत्सेवा करण्याची इच्छा व्यक्त करतात. अशांना सत्सेवेची संधी देणे, हे उत्तरदायी साधकांचे कर्तव्य आहे. सत्सेवा मागूनही ती न देणे, हे उत्तरदायी साधकांच्या समष्टी साधनेच्या दृष्टीने अयोग्य आहे. सत्सेवेमुळे साधकाला सत्मध्ये रहाण्याची सवय लागते आणि त्याची साधनेची गोडी वाढते.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१४.११.२०२१)
‘पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय, हा साधकाच्या जीवनातील सर्वाेत्तम निर्णय असतो. साधनेसाठी किंवा गुरूंसाठी सर्वस्वाचा त्याग करण्याची अशी क्षमता किती जणांत असते ?’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१४.११.२०२१)