संस्कृत भाषेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि तिचा प्रचार करण्यासाठी पावले उचलणे आवश्यक ! – भाजपशासित हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर

यासाठी सरकारने त्वरित पावले उचलावीत, अशी जनतेची अपेक्षा आहे ! – संपादक

हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर

शिमला (हिमाचल प्रदेश) – संस्कृत ही प्राचीन भाषा आणि जगातील प्रमुख भाषांपैंकी एक आहे. भारताने जगाला दिलेली ही सर्वांत मोठी देणगी आहे. संस्कृत भाषा ही साहित्याचा महासागर आहे. देवभाषा संस्कृत हा वेद, शास्त्र, काव्य आणि अनेक ज्ञानरूपी मोती यांचा स्रोत आहे. संस्कृत भाषेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि तिचा प्रचार करण्यासाठी पावले उचलणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन भाजपशासित हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी एका कार्यक्रमात केले. ते येथील ‘संस्कृत भारती’च्या ‘ऑनलाईन’ कार्यक्रमात बोलत होते. ‘राज्य सरकार संस्कृत शिकवणार्‍या शिक्षकांच्या मागण्यांविषयी सहानुभूतीने विचार करील’, असे आश्‍वासनही त्यांनी या वेळी दिले.

शिक्षणमंत्री गोविंद सिंह ठाकूर या वेळी म्हणाले की, राज्य सरकार संस्कृत भाषेला लोकप्रिय बनवण्यासाठी  कटीबद्ध आहे. यासाठी सरकारने संस्कृतला द्वितीय राज्यभाषेचा दर्जा दिला आहे. सरकारी शाळांमध्ये संस्कृत शिक्षकांची भरती केली जात आहे. यामुळे विद्यार्थी संस्कृत शिकू शकतील.