परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले रामनाथी आश्रमातील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. शिरीष देशमुख (वय ७५ वर्षे) !

श्री. शिरीष देशमुख

१. इतरांचा विचार करणे

श्री. देशमुखकाका काही काळ पुष्कळ रुग्णाईत होते; म्हणून काही साधकांचे त्यांच्या साहाय्यासाठी नियोजन केले होते. तेव्हा त्यांच्या मनात ‘माझ्यामुळे साधकांना त्रास व्हायला नको आणि त्यांच्या सेवेत खंड पडायला नको’, असे विचार असायचे.

श्री. अतुल दिघे

२. चुका स्वीकारणे

एकदा सहसाधकांनी त्यांना त्यांच्याकडून झालेल्या चुकांची जाणीव करून दिली. तेव्हा त्यांनी त्या चुका लगेच स्वीकारल्या आणि त्यानुसार स्वतःमध्ये पालटही केले.

३. भावजागृती सहज होणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेल्या मार्गदर्शनातील काही सूत्रे कुणाकडूनही त्यांना कळली, तर लगेच त्यांचा भाव जागृत होतो.

४. काकांचा श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्याविषयीही भाव जाणवतो.

– श्री. अतुल दिघे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.१.२०२२)