संध्याकाळी वारा वहात नसल्याने पुष्कळ गरम होणे आणि प.पू. दास महाराज यांनी वायुपुत्र हनुमानाला प्रार्थना केल्यावर जोराचा वारा सुटणे

सौ. वैशाली मुद्गल

‘२२.३.२०२१ या दिवशी संध्याकाळी ७.५५ वाजता प.पू. दास महाराज (प.पू. बाबा) आगाशीत शतपावली करत होते. त्या वेळी मीही त्यांच्या समवेत होते. तेव्हा पुष्कळ गरम होत होते. वारा वहात नव्हता. तेव्हा मी त्यांना म्हणाले, ‘‘प.पू. बाबा, आता वारा वहात नाही आणि आपत्काळात वीज अन् पंखा नसणार, तर कसे होईल ?’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘वायुपुत्र हनुमानाला प्रार्थना करायची, ‘तूच ये आणि वारा सोड.’’ ते असे सांगत असतांना जोरात वारा आला. त्या वेळी तेथे इतर साधकही होते. वारा इतका जोरात सुटला की, आम्ही सर्व जण वार्‍यामुळे हलत आहोत, असे जाणवत होते. सर्व साधक म्हणाले, ‘‘प.पू. बाबा, तुम्ही प्रार्थना करत असतांनाच वारा सुटला.’’ तेव्हा प.पू. दास महाराज म्हणाले, ‘‘मी कुठे काय केले आहे ? पवनपुत्र हनुमान आणि परात्पर गुरु डॉक्टर यांच्यामुळे वारा सुटला आहे.’’

– सौ. वैशाली मुद्गल, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२९.३.२०२१)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक