कर्नाटकातील अल्पसंख्यांकांच्या शाळांमध्येही हिजाबवर बंदी ! – राज्य सरकारचा आदेश

बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटक सरकारने आता अल्पसंख्यांकांसाठीच्या शाळांमध्येही हिजाबवर बंदी घालण्याचा आदेश दिला आहे. राज्यातील मौलाना आझाद आदर्श इंग्रजी माध्यमाच्या शाळांसह अल्पसंख्यांक कल्याण विभागाद्वारे चालवल्या जाणार्‍या शाळांत शिकणार्‍या विद्यार्थिनींना हिजाब घालण्यास मनाई करण्यात आली आहे. यापूर्वी सरकारने सरकारी शाळा आणि महाविद्यालये येथे हिजाब घालून येण्यास बंदी घातली होती.

आदेशात म्हटले आहे की, कर्नाटक उच्च न्यायालयाचा आदेश अल्पसंख्यांक कल्याण विभागांतर्गत येणार्‍या निवासी शाळा, महाविद्यालये आणि मौलाना आझाद आदर्श इंग्रजी माध्यमांच्या शाळा यांच्यासाठीही लागू आहे. मौलाना आझाद आदर्श इंग्रजी माध्यमाच्या शाळा, तसेच अल्पसंख्यांक कल्याण विभागांतर्गत येणार्‍या शाळा आणि महाविद्यालये यांच्या वर्गांमध्ये भगवी शाल, स्कार्फ आणि हिजाब घालण्यास मनाई आहे.