‘हिंदु धर्मातील अनेक देवतांना विशिष्ट प्रकारचे वाहन असते. देवतांना विशिष्ट प्रकारचे वाहन असण्यामागील अध्यात्मशास्त्र पुढीलप्रमाणे आहे.
१. ‘वाहन’ या शब्दाचा अर्थ : ‘वाहन’ या शब्दाचा अर्थ आहे ‘वहन करणे.’
२. विशिष्ट देवतेला विशिष्ट प्रकारचे वाहन असण्यामागील अध्यात्मशास्त्र
काही प्रकारचे पशू-पक्षी सात्त्विक असल्यामुळे त्यांच्यामध्ये विशिष्ट देवतेचे तत्त्व वहन करण्याची क्षमता असते. जेव्हा देवतांचे भक्त देवतांना आवाहन करतात, तेव्हा त्यांना सगुणातून दर्शन देण्यासाठी किंवा पृथ्वीवर आलेल्या पाताळातील अनिष्ट शक्तींशी सूक्ष्म युद्ध करण्यासाठी देवतांना त्यांच्या दैवी लोकातून पृथ्वीवर यावे लागते. तेव्हा देवतांचे सगुणतत्त्व वहन करण्याची क्षमता विशिष्ट प्रकारच्या सात्त्विक पशू-पक्षांमध्ये असल्यामुळे देवता विशिष्ट पशूला किंवा पक्षाला त्यांचे वाहन बनवून त्यावर आरूढ होऊन पृथ्वीवर किंवा अन्य ठिकाणी जातात.
३. विशिष्ट देवता त्यांच्या विशिष्ट प्रकारच्या वाहनावर आरूढ झाल्यामुळे सूक्ष्म स्तरावर होणारी प्रक्रिया
‘वायूगती’ म्हणजे, ‘वायूची गती’ आणि ‘मनोजवा’ म्हणजे, ‘मनाची गती’. वायूगतीपेक्षा ‘मनोजवा’, मनोजवापेक्षा ‘र्हंस’ गती आणि ‘र्हंस’ पेक्षा ‘महार्हंस’ गती अधिक सूक्ष्मतर अन् तीव्र आहेत. विविध देवता ‘र्हंस’ आणि अवतार ‘महार्हंस’ या गतीने ब्रह्मांडात कार्यरत होतात. त्यामुळे जेव्हा देवतांच्या सगुण रूपांना र्हंस किंवा महार्हंस गतीने इच्छित ठिकाणी पोचायचे असते, तेव्हा या तीव्र गतीने देवतांचे तत्त्व धारण करून त्यांचे वहन करणारे देवतेचे विशिष्ट प्रकारचे वाहन उपयुक्त ठरते. त्यामुळे विशिष्ट देवतेचे विशिष्ट प्रकारचे वाहन असते.
४. देवता आणि त्यांचे वाहन
टीप १ : हिंदु धर्मानुसार सरस्वतीदेवीचे वाहन पांढर्या रंगाचा राजहंस आहे, तर जैन पंथानुसार सरस्वतीदेवीचे वाहन मोर आहे. राजहंस सात्त्विक आहे आणि मोर सत्त्व-रजप्रधान आहे. सरस्वतीदेवी सत्त्वप्रधान असल्यामुळे तिचे वाहन मोर नसून राजहंस आहे.
टीप २ : संकेतस्थळावर उपलब्ध असणार्या माहितीनुसार महालक्ष्मीदेवीचे वाहन ‘घुबड’ आहे. ‘घुबड’ हा पक्षी सात्त्विक नसल्यामुळे तो महालक्ष्मीदेवीचे वाहन नसणार’, असे मला वाटते. मला सूक्ष्मातून मिळालेल्या ज्ञानानुसार महालक्ष्मीदेवीचे वाहन पांढरा हत्ती आहे. ‘हत्ती’ हा प्राणी शक्तीसह ऐश्वर्याचेही प्रतीक आहे. त्याचप्रमाणे अष्टलक्ष्मींपैकी ‘गजलक्ष्मी’ हे रूप ‘गजावर’ म्हणजे, हत्तीवर आरूढ असते. त्यामुळे महालक्ष्मीचे वाहन घुबड नसून पांढरा हत्ती आहे.
टीप ३ : ‘महागौरी’ आणि ‘शैलपुत्री’ ही देवीची रूपे पांढर्या शुभ्र वृषभावर आरूढ आहेत.
५. नवग्रह आणि त्यांची वाहने
टीप १ – ‘कमळ’ हे ज्ञानाचे प्रतीक आहे. पूर्ण उमललेल्या कमळातून ज्ञानशक्ती प्रवाहित होत असते. ‘गुरु’ हा ग्रह ज्ञानस्वरूप असल्यामुळे गुरुग्रहाचे आसन कमलासन आहे.
टीप २ – ‘कावळा आणि गिधाड’, हे तमोगुणी पक्षी असल्यामुळे ते तमोगुणी असणार्या शनीचे वाहन आहेत. केतुही तमोगुणी असल्यामुळे त्याचेही वाहन गिधाड आहे.
६. देवतांच्या वाहनाला देवत्त्व प्राप्त झालेले असणे
देवतांचे सगुण रूप वहन केल्यामुळे देवतांच्या वाहनांनाही देवत्त्व प्राप्त झालेले आहे. त्यामुळे हिंदु धर्मामध्ये बैलपोळ्याला शिवाचे वाहन असलेल्या बैलांचे, काही धार्मिक विधींमध्ये विष्णुवाहन गरुडाचे आणि अश्वमेधासारख्या यज्ञांमध्ये अश्वाचे म्हणजे, घोड्याचे पूजन केले जाते.’
– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान) (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१४.१०.२०२१)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |