हिजाबचा विषय केवळ कर्नाटकपुरता मर्यादित नाही, तर हे पूर्वनियोजित आंतरराष्ट्रीय षड्यंत्र आहे. ‘शेतकर्यांचे कथित आंदोलन’, ‘पुरस्कार वापसी’ याप्रमाणे सध्याच्या ‘हिजाब’च्या विषयावर ट्विटरवर लाखो ट्वीटस् करून त्यात पाकचे पंतप्रधान इम्रान खान, नोबेल पुरस्कार विजेती मलाला, पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग यांच्यासह गणवेश आणि समानता याचा अर्थ न कळलेल्या काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी सहभागी होणे, यातून हा ‘आंतरराष्ट्रीय अजेंडा (कार्यसूची)’ आहे, हे स्पष्ट होते. जगभरातील अनेक इस्लामी देशांत शाळा, महाविद्यालये, सरकारी संस्था येथे हिजाब, बुरखा यांवर बंदी आहे; मात्र भारतात हिजाबची मागणी का होत आहे ?