वाईन हे मद्य नाही, तर येणार्‍या अर्थसंकल्पीय अधिवेशनात चहा-पाण्याऐवजी वाईन द्या !

भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांचा टोला

भाजपचे आमदार बबनराव लोणीकर

जालना – आघाडी सरकारमधील प्रतिदिन एक मंत्री ‘वाईन हे मद्य नाही’, असे वक्तव्य करत आहे. असे असेल, तर येणार्‍या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या सरकारने सर्वांना चहा-पाण्याविना वाईनच द्यावी. या सरकारला जनाची नाही, तर मनाची लाज असेल, तर त्यांनी हा दुर्दैवी निर्णय मागे घ्यावा, अन्यथा विधानसभेचे अधिवेशन चालू देणार नाही, अशी चेतावणी भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी १३ फेब्रुवारी या दिवशी येथे दिली. ते पुढे म्हणाले की, सध्या द्राक्षाच्या मालाला भाव नसल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. शेतकर्‍यांच्या द्राक्षाला प्रतिक्विंटल १० सहस्र रुपये भाव देऊन शेतकर्‍यांच्या हिताचा निर्णय घ्यावा.