रामाच्या आठवणीत मग्न असल्याने ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. महानंदा पाटील यांना जिना चढून खोलीत आल्याचेही न जाणवणे

कु. महानंदा पाटील

‘२३.३.२०२० या दिवशी दुपारी ३.४५ वाजता मी सेवा झाल्यावर दुसर्‍या माळ्यावरील खोलीत जात होते. मी खोलीत गेल्यावर ‘मी दोन जिने चढून वर आले आहे’, असे मला जाणवलेच नाही. त्या वेळी ‘हे कसे शक्य आहे ?’, असा विचार माझ्या मनात आला. आणखी एकदा असेच झाले. मी रामाच्या आठवणीत मग्न होते. तेव्हा जिना चढतांना माझे पाय दुखले नाहीत. मला स्वतःची स्थुलातून कोणतीच जाणीव नव्हती. त्यामुळे ‘मी जिना चढून आले आहे’, हे मला जाणवले नाही.’ – रामाची दासी, कु. महानंदा पाटील, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (३.४.२०२०)

 येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक