अल् कायदाच्या आतंकवाद्याला अटक

उत्तरप्रदेशात बाँबस्फोट करण्याचा कट  

अशा आतंकवाद्यांवर जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीचीच शिक्षा करायला हवी ! – संपादक

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने उत्तरप्रदेशात बाँबस्फोट करण्याच्या कटाच्या प्रकरणी अल् कायदाचा आतंकवादी तौहीद अहमद शाह याला अटक केली आहे. तो जम्मू-काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात रहाणारा आहे. यापूर्वी या कटाच्या प्रकरणी ५ आतंकवाद्यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर आरोपपत्रही प्रविष्ट करण्यात आले आहे.