उत्तरप्रदेश निवडणुकीसाठी भाजपचे घोषणापत्र प्रसिद्ध
जनतेला अशा प्रकारे विनामूल्य वस्तू देण्याचे आश्वासन देणे, म्हणजे मतांसाठी लाच देणेच होय ! अशी आश्वासने देणारे सर्व राजकीय पक्ष लोकशाहीला अपकीर्तच करत आहेत !
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – येथील विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजपकडून घोषणापत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. भाजपने याला ‘लोक कल्याण संकल्प पत्र’ म्हटले आहे. यात ३ कोटी तरुणांना रोजगार, तसेच महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थिनींना विनामूल्य स्कूटी (दुचाकी) देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
युवाओं के लिए भाजपा के खास संकल्प
सक्षम युवा के लिए भाजपा एक विकल्प#भाजपा_का_संकल्प pic.twitter.com/qud3RzSX4v— BJP Uttar Pradesh (@BJP4UP) February 8, 2022
मातृशक्ति का मान-सम्मान और बढ़ाएगी
भाजपा फिर से जो कहेगी, करके दिखाएगी#भाजपा_का_संकल्प pic.twitter.com/DvRDoP0wAW— BJP Uttar Pradesh (@BJP4UP) February 8, 2022
कृषि और किसानों को और समृद्ध बनाएगी
भाजपा फिर से जो कहेगी, कर के दिखाएगी#भाजपा_का_संकल्प pic.twitter.com/paVoq4y165— BJP Uttar Pradesh (@BJP4UP) February 8, 2022
यासह शेतकर्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्देशाने विविध पावले उचलणे, उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत होळी आणि दिवाळी या काळात विनामूल्य २ सिलिंडर देणे, पुढील ५ वर्षांत सर्व शेतकर्यांना सिंचनासाठी विनामूल्य वीज देणे, ५ सहस्र कोटी रुपये खर्चाची ‘मुख्यमंत्री कृषी सिंचन योजना’ चालू करून याद्वारे अल्प अन् अत्यल्प भूधारक शेतकर्यांना कूपनलिका, तलाव, टाक्या इत्यादी बांधकामासाठी अनुदान देणे आदी आश्वासनेही भाजपने दिली आहेत.