मानवा, निसर्गावर प्रेम करण्यास शीक ।

प्रत्येकाला होती घाई भौतिक सुख तेवढे मिळावे ।
कुणालाच या जगण्यात जणू परोपकार ना कळावे ।। १ ।।

नाती-गोती विसरूनी सारे विदेशी जाण्या होती उत्सुक ।
शिक्षण, अर्थ (पैसा) अन् स्वच्छंद जगणे
याचेच तेवढे कौतुक ।। २ ।।

अहंकार तो किती असावा, कळले ना कुणालाही ।
मी आणि माझे यांतच दडले होते सारे काही ।। ३ ।।

स्वप्न उराशी बाळगून कष्टकरी तो झिजत होता ।
श्रीमंत मात्र वेळोवेळी आपल्याच धुंदीत जगत होता ।। ४ ।।

येई वेळ जेव्हा निसर्ग प्रकोपाची ।
आठवण होई तेव्हा केवळ ईश्वरी सान्निध्याची ।। ५ ।।

आता आला तो क्षण पुन: एकदा सिद्ध व्हावे ।
मनुष्याने पुन्हा जणु शून्यातून
हे विश्वची निर्माण करावे ।। ६ ।।

आता तरी मानवा, तू मानवाप्रमाणे वागणे शिक ।
निसर्गाची छेड न काढता, त्यावर प्रेम करणे शिक ।। ७ ।।

जन्म आपला या मातीत
अन् कृतज्ञताभाव जर मानवात असेल ।
निसर्गाचेच वरदान ते, अवनीवर स्वर्ग वसेल ।। ८ ।।

– सौ. नेहा क्षीरसागर, नागपूर (१८.६.२०२०)