कर्नाटकातील महाविद्यालयांमध्ये हिजाब आणि भगवे उपरणे घालून येण्यावर बंदी

बेंगळुरू (कर्नाटक) – राज्यातील उडुपी येथील काही महाविद्यालयांमध्ये मुसलमान विद्यार्थिनींनी हिजाब (डोके, चेहरा आणि मान झाकण्याचे वस्त्र) घालून येण्याची मागणी केल्यानंतर हिंदु विद्यार्थ्यांनी भगवे उपरणे घालून येण्यास प्रारंभ केल्यानंतर राज्य सरकारने या दोन्हींना महाविद्यालयात बंदी घातली आहे. सरकारने विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचा गणवेश आणि खासगी वेशभूषा परिधान करण्याची सक्ती केली आहे.