(म्हणे) ‘हिवाळी ऑलिंपिक’मध्ये कोरोनावर निर्बंध घालण्याच्या चीनच्या प्रयत्नांचे विदेशी पत्रकारांकडून कौतुक !’

‘ग्लोबल टाईम्स’ या चीनच्या सरकारी मुखपत्राद्वारे चीनचा स्वतःची पाठ थोपटून घेण्याचा केविलवाणा प्रयत्न !

  • वृत्तात एकाही विदेशी पत्रकाराचे नाव नाही !
  • पत्रकारितेतील ‘वस्तुनिष्ठता’ हा साधा नियमही न पाळणारे ‘ग्लोबल टाईम्स’ वृत्तपत्र ! अविश्‍वासार्ह वृत्तांचा भरणा असलेले हे वृत्तपत्र म्हणे ‘ग्लोबल’ !
प्रातिनिधिक छायाचित्र

बीजिंग –  ‘हिवाळी ऑलिंपिक’मध्ये कोरोनावर निर्बंध घालण्याच्या चीनच्या प्रयत्नांचे विदेशी पत्रकारांकडून पुष्कळ कौतुक होत असल्याचे वृत्त चीन सरकारचे मुखपत्र असलेल्या ‘ग्लोबल टाईम्स’ने प्रसिद्ध केले आहे. या वृत्तात म्हटले आहे, ‘‘जपानमधील एका पत्रकाराने नाव न सांगण्याच्या अटीवर ‘ग्लोबल टाईम्स’ वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत चीन सरकारचे कौतुक केले आहे. त्याने म्हटले आहे की, चीन सरकारने पूर्ण विचार करून केलेले प्रयत्न पुष्कळ चांगले आहेत. सर्व काही सुनियोजित आहे आणि मला येथील ‘रेड बबल’मध्ये (कोरोना विषाणूपासून रक्षण होण्यासाठी सिद्ध केलेले संरक्षित क्षेत्र) सुरक्षित वाटत आहे.’’

या वृत्तात पुढे म्हटले आहे की,

१. जपानच्या ‘क्योडो न्यूज’ने त्याच्या पत्रकारांच्या हवाल्याने सांगितले की, टोकियोतील वर्ष २०२० च्या ऑलिंपिकसाठी कोरोना प्रतिबंधक प्रयत्नांच्या तुलनेत चीनचे प्रयत्न उत्कृष्ट आहेत.

२. इतर देशांतील पत्रकारांनीही ‘ते सुरक्षित आहेत’, अशी भावना व्यक्त केली आहे.