‘सनातनच्या दैवी बालकांची अलौकिक गुणवैशिष्ट्ये’
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संकल्पानुसार काही वर्षांतच ईश्वरी राज्याची स्थापना होणार आहे. अनेकांच्या मनात ‘हे राष्ट्र चालवणार कोण ?’, असा प्रश्न येतो. त्यासाठी ईश्वराने उच्च लोकांतून दैवी बालकांना पृथ्वीवर जन्म देऊन पाठवले आहे. या दैवी बालकांतील शिकण्याची वृत्ती, वैचारिक प्रगल्भता, त्यांच्यात उत्तम शिष्याचे अनेक गुण असणे, श्री गुरूंचे आज्ञापालन त्वरित करणे, त्यांना येणार्या अनुभूती आणि त्यांची सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता अशी अलौकिक वैशिष्ट्ये या सदरांतर्गत प्रसिद्ध करत आहोत.
‘कु. प्रार्थना पाठक हिने लहान वयात वाचन केलेल्या ग्रंथांची यादी लेखात दिली आहे. वयाने मोठे असलेले किती साधक असे वाचन करतात ? या वाचनामुळे, अभ्यासामुळे इतक्या लहान वयात प्रार्थनाने ६७ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली आहे. पुढे ती लवकरच संत बनेल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२.२.२०२२) |
वयाच्या ८ व्या वर्षापासून विविध ग्रंथ आणि दैनिक ‘सनातन प्रभात’ यांचे अभ्यासपूर्ण वाचन करणारी पुणे येथील ६७ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. प्रार्थना पाठक (वय १० वर्षे) !
१. ‘सनातनचे ग्रंथ आणि दैनिक ‘सनातन प्रभात’ यांविषयी कु. प्रार्थनाला असलेली ओढ अन् तिची अभ्यासू वृत्ती
अ. ‘कु. प्रार्थनाला बालपणापासूनच सनातनच्या ग्रंथांविषयी ओढ आहे. ती ४ – ५ मासांची असल्यापासून तिला सनातनचे ग्रंथ दाखवल्यावर आनंद होत असे.
आ. प्रार्थना ६ मासांची असल्यापासून ‘सनातन पंचांग, सनातनचे ग्रंथ, दैनिक ‘सनातन प्रभात’ यांतील प.पू. भक्तराज महाराज, त्यांचे शिष्य प.पू. रामानंद महाराज आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांची छायाचित्रे ओळखायची.
इ. तिने कधीही सनातनचे ग्रंथ, दैनिक ‘सनातन प्रभात’ यांचे कागद फाडले नाहीत. ती सनातनचे ग्रंथ आणि दैनिक ‘सनातन प्रभात’ अतिशय प्रेमाने हाताळायची. तिने कधीही इतर लहान मुले रेघोट्या ओढतात, तशा सनातनचे ग्रंथ आणि दैनिक ‘सनातन प्रभात’ यांवर रेघोट्या ओढल्या नाहीत.
ई. शाळेत ‘अ, आ, ई..’ अशी मुळाक्षरे शिकल्यानंतर प्रार्थना दैनिक ‘सनातन प्रभात’मधील आकाशओळी वाचण्याचा प्रयत्न करत असे. ४ वर्षांची असल्यापासून ती तिच्या वडिलांना (श्री. महेश पाठक यांना, आध्यात्मिक पातळी ६८ टक्के) दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचून दाखवायला सांगायची.
उ. प्रार्थना ७ वर्षांची असल्यापासून स्वतः दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचत असे. ती दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध होणार्या प.पू. भक्तराज महाराज यांच्या प्रासादिक शिकवणीचा, म्हणजेच अमृतवचनांचा अर्थ विचारत असे. ती दैनिकामध्ये येणारा योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांचा ‘ॐ आनंदं हिमालयं विष्णुं गरुडध्वजं ॐ । ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहं ॐ ।।’ हा मंत्र वाचण्याचा प्रयत्न करायची. ती बालसाधक आणि साधक यांच्या अनुभूती यांविषयीचे लेख वाचण्याचा प्रयत्न करायची.
ऊ. प्रार्थना दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध होणारी विविध सदरे, संपादकीय लेख’ यांतील तिला समजणार्या विषयांचे वाचन करत असे. ती नियमितपणे ‘तिला लेखांमधील काही शब्द समजले नाहीत, तर ते विचारणे आणि लक्षात ठेवणे’, असे प्रयत्न करत असे.
२. कु. प्रार्थनाला असलेली ग्रंथवाचनाची आवड
अ. प्रार्थना ८ वर्षांची असल्यापासून नियमितपणे ग्रंथवाचन करते. मार्च २०२० मध्ये आम्ही (श्री. महेश पाठक, सौ. मनीषा पाठक आणि कु. प्रार्थना पाठक) गोवा येथील सनातनच्या रामनाथी आश्रमात आलो होतो. तेव्हापासून प्रार्थना ग्रंथवाचन करून ग्रंथांमधील सूत्रे लिहून काढण्याचा प्रयत्न करते.
आ. ग्रंथवाचन चालू केल्यावर ग्रंथ पूर्ण वाचून होईपर्यंत प्रार्थनाला चैन पडत नाही. ग्रंथवाचनाला आरंभ करतांना ती ग्रंथाचे मुखपृष्ठ, अनुक्रमणिका, ग्रंथाची पृष्ठसंख्या, संकलनाच्या पद्धती (जसे परिच्छेदाच्या शेवटी संदर्भ लिहिलेले असतात, उदा. १२ ते १२ अ २ उ) याचा अभ्यास करते.
३. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी लिहिलेले ग्रंथ म्हणजे ज्ञानमार्गासहित भक्तीमार्ग आहेत’, असे सांगणारी १० वर्षांची कु. प्रार्थना !
माझ्या आईला (श्रीमती सुरेखा सरसर, वय ६५ वर्षे) वाचनाची पुष्कळ आवड आहे. मी रुग्णाईत असल्याने ती माझ्या साहाय्यासाठी रामनाथी आश्रमात आली होती. आईने ग्रंथवाचन करायला आरंभ केल्यावर प्रार्थनाही ग्रंथवाचन करत असे. आई प.पू. भक्तराज महाराज यांच्याविषयीचे ग्रंथ वाचत असे. त्यांची शिकवण आणि अन्य ग्रंथ वाचतांना आईची पुष्कळ भावजागृती होत असे. ते पाहून प्रार्थनाचीही भावजागृती व्हायची. एकदा प्रार्थना म्हणाली, ‘‘आई, आपल्या परात्पर गुरु डॉक्टरांनी लिहिलेले ग्रंथ म्हणजे ज्ञानमार्ग आहेच; पण तो भक्तीमार्गही आहे. काही ग्रंथांतील काही पाने वाचल्यावर माझी पुष्कळ भावजागृती होते. त्यामुळे भावजागृतीसाठी ग्रंथ वाचायला हवेत ना ?’’
४. कु. प्रार्थना हिने वाचलेले काही ग्रंथ आणि ग्रंथांतून शिकायला मिळालेली सूत्रे आचरणात आणण्याचा प्रयत्न करणे
संतांच्या गोष्टी, बोधकथा, रामायणातील गोष्टी, संत सावतामाळी यांच्या गोष्टी, श्रीसमर्थ यांची ग्रंथसंपदा, रामकृष्ण परमहंस यांची वाक्सुधा, संस्कार ठेवा, लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस, ‘नरेंद्र ते स्वामी विवेकानंद’ आदी ग्रंथ तिने वाचले आहेत. ती ग्रंथ वाचल्यावर ‘तिला त्यातून काय शिकायला मिळाले ? ती कुठे अल्प पडते ?’, याविषयी सांगते. ती ग्रंथातील एखादे सूत्र आचरणात आणण्याचा प्रयत्न करते, उदा. ‘रामकृष्ण परमहंस यांची वाक्सुधा’ हा ग्रंथ वाचल्यानंतर ‘ती त्यातील उदाहरणे कशी कृतीत आणू शकते ?’, ते ठरवते. त्या ग्रंथातील एका प्रसंगात राजस्थानमधील महिला डोक्यावर कळश्या घेऊन जात असतांना मैत्रिणींशी बोलत असतात. तेव्हा त्यांचे लक्ष कळश्यांकडेही असते. यातून तिला ‘अनुसंधानात कसे रहायचे ?’, हे शिकायला मिळाले. ती मला म्हणाली, ‘‘आई, मीही खेळतांना, चालतांना आणि कोणतीही कृती करतांना अनुसंधानात रहाण्याचा प्रयत्न वाढवते. तू मला साहाय्य कर.’’
कु. प्रार्थनाने सनातन ग्रंथमालिकेतील वाचलेले आणि ती वाचत असलेले ग्रंथअ. आपत्काळातील जीवितरक्षण विषयीची ग्रंथमालिका १. आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी दैनंदिन स्तरावर सिद्धता करा ! (अन्न, पाणी, वीज इत्यादींविषयीच्या सिद्धता) आ. निरोगी आणि दीर्घायुषी जीवनासाठी उपयुक्त ‘आयुर्वेदविषयक ग्रंथमालिका’ १. आयुर्वेदीय औषधांचे गुणधर्म आणि औषधनिर्मिती इ. बालकभावातील चित्रे १. बालकभावातील चित्रे भाग १ (कृष्णभक्तीचा आनंद देणारी चित्रे त्यांच्या गुणवैशिष्ट्यांसह) ई. सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांचे साधनापूर्व जीवन अन् साधनाप्रवास उ. अमृतमय गुरुगाथा १. खंड १ : डॉ. (सौ.) कुंदा आठवले यांच्या आध्यात्मिक जीवनाचा आरंभ आणि त्यांना झालेली गुरुप्राप्ती (गुरु प.पू. भक्तराज महाराज यांच्या अमृत महोत्सव सोहळ्यासह) ऊ. भावी पिढी धर्मनिष्ठ अन् राष्ट्रभक्त बनवणारी ग्रंथमालिका १. सुसंस्कार आणि चांगल्या सवयी ए. आपत्काळात संजीवनी ठरणारी ग्रंथमालिका १. जागेच्या उपलब्धतेनुसार औषधी वनस्पतींची लागवड ऐ. हिंदु धर्मातील नित्य आचारांचे पालन शिकवणारी ग्रंथमालिका १. दिनचर्या खंड १ – स्नानपूर्व आचारांमागील शास्त्र ओ. सुखी जीवन आणि व्यक्तीमत्त्व विकास यांसाठी उपयुक्त ग्रंथमालिका १. स्वभावदोष (षड्रिपू) निर्मूलनाचे महत्त्व आणि गुण-संवर्धन प्रक्रिया औ. प. पू. बाळाजी आठवले यांचे विचारधन खंड ३ – सुगम अध्यात्म क. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार (राष्ट्रजागृती, धर्मरक्षण आदींविषयी मार्गदर्शन !) ख. परात्पर गुरु डॉ. आठवले रचित आध्यात्मिक काव्यसंग्रह ग. परात्पर गुरु डॉ. आठवले यांची साधकांचे कौतुक करणारी कविता – ‘साधकांनो, तुम्ही जिंकलात, मी हरलो !’ घ. भजने आणि त्यांचे भावार्थ – भाग १ – चंद्रकांतदादा दळवी च. संत भक्तराज महाराज यांची शिकवण छ. योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन (गुणवैशिष्ट्ये, कार्य, सिद्धी आणि देहत्याग) |
४. दैनिक ‘सनातन प्रभात’मधील लेखमालांचा अभ्यास करणे
प्रार्थना दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये येणार्या पुढील लेखमालांचा अभ्यास करते.
अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दैनिक ‘सनातन प्रभात’मधील चुकांविषयीचे लेख
आ. कु. सुप्रिया नवरंगे यांनी मराठी व्याकरणाविषयी ‘सनातनचे अध्यात्मावर आधारित मराठी व्याकरण’ या संदर्भात लिहिलेले लेख
इ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आई-वडिलांविषयी प्रसिद्ध झालेल्या लेखांतून ती ‘त्यांनी मुलांवर कसे संस्कार केले ?’, हे शिकली.
‘या लेखमालेतील पुढचा भाग कधी येणार ?’, याची ती उत्सुकतेने वाट पहायची.
५. दैनिक ‘सनातन प्रभात’मधील चौकटीविषयी प्रार्थनाने केलेले चिंतन
ऑगस्ट २०२० मध्ये ‘विमान प्रवासात घ्यायची काळजी’ याविषयीची चौकट दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये छापून आली होती. त्या चौकटीखाली लेखकाचे नाव नव्हते. ती वाचून प्रार्थना म्हणाली, ‘‘आई, या साधकाने किती मनापासून आणि भावपूर्ण सूत्रे लिहिली आहेत. कुणीही वाचले, तरी त्यांना ‘काय काळजी घ्यायची ?’, हे समजेल.’’ तिला त्या चौकटीतील लिखाणात भाव जाणवला.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांना एकदा सत्संगात हा विषय सांगितल्यावर ते म्हणाले, ‘‘हे वेगळे आहे ना ! ‘चौकट वाचून त्या साधकांचा भाव कसा आहे ?’, इथपर्यंत कुणी पोचत नाही ना ! कविता, लेख इत्यादी वाचून इतरांना भाव जाणवतो; पण चौकट वाचून एवढा विचार कुणी करत नाही. इतक्या लहान वयात प्रार्थनाला तो जाणवला, हे विशेष आहे.’’
– सौ. मनीषा पाठक (आई) (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के), पुणे (१.१.२०२१)