परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या देवघरातील प.पू. भक्तराज महाराज यांचे छायाचित्र आणि श्री दुर्गादेवीचे चित्र यांच्या संदर्भात त्यांना आलेल्या अनुभूती

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या देवघरातील प.पू. भक्तराज महाराज यांचे छायाचित्र आणि श्री दुर्गादेवीचे चित्र यांच्या संदर्भात त्यांनी केलेले पंचतत्त्वांच्या स्तरांवरील प्रयोग आणि त्यांना आलेल्या अनुभूती

आज वसंतपंचमी (५.२.२०२२) या दिवशी प.पू. भक्तराज महाराज यांचा प्रकटदिन आहे. त्या निमित्ताने…

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘माझ्या खोलीतील देवघरामध्ये ठेवलेल्या प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्रात यापूर्वी काळानुसार अनेक पालट दिसून आले. त्या छायाचित्रातील चैतन्य वाढल्यामुळे छायाचित्रातील प.पू. बाबांचे मुखमंडल पिवळसर पांढरे दिसत आहे. आता त्यांच्या डोक्यामागील प्रभावळ गडद पांढरी झाली आहे (छायाचित्र ‘आ’ पहावे.) आणि श्री दुर्गादेवीच्या चित्रातील देवीच्या डोक्यामागील प्रभावळ विरळ झाली आहे. (छायाचित्र ‘ई’ पहावे.) या आध्यात्मिक स्तरावरील पालटांमुळे पंचतत्त्वे आणि प्रीती यांच्या स्तरांवर काय अनुभूती येते, याचा मी अभ्यास केला. त्यामध्ये पुढील भाग लक्षात आला.

यातून लक्षात आले की, प.पू. भक्तराज महाराज यांचे कार्य पृथ्वी, आप आणि तेज या तत्त्वांच्या स्तरांवर अधिक प्रमाणात आहे, तर श्री दुर्गादेवीचे कार्य वायू आणि आकाश या तत्त्वांच्या स्तरांवर अधिक प्रमाणात आहे. थोडक्यात प.पू. भक्तराज महाराज यांचे कार्य माझ्या व्यष्टी साधनेसाठी असल्यामुळे ते सगुण स्तरावरील आहे, तर श्री दुर्गादेवीचे कार्य सनातन संस्थेच्या कार्यासाठी चालू असल्यामुळे ते सगुण-निर्गुण स्तरावरील आहे.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२१.१.२०२२)