भारताचा लचका तोडून स्वतंत्र मोगलिस्तान बनवण्याची मागणी धर्मांधांकडून केली जाते, तसेच त्यांच्याकडून हिंदूंना ठार मारण्याच्या उघड धमक्या दिल्या जातात. त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद करून संबंधितांवर कारवाई करण्याचे धारिष्ट्य पोलीस कधी दाखवतात का ?
मुंबई – अकबर आणि टिपू सुलतान यांची चित्रे राज्यघटनेतून काढण्याच्या मागणीवरून महाराष्ट्र करणी सेना प्रमुख अजयसिंह सेंगर यांच्यावर राष्ट्रप्रतिष्ठेचा अवमान झाला म्हणून १९७१ च्या कायद्याच्या कलम २ नुसार खांदेश्वर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
देशाने छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांच्या मार्गावर चालावे, यासाठी ही चित्रे काढावीत अन्यथा देशात नवीन घटना अस्तित्वात आणावी, अशी मागणी अजयसिंह सेंगर यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना निवेदनाद्वारे केली होती. त्यानंतर प्रभाकर कांबळे यांनी नवी मुंबई येथील खांदेश्वर पोलीस ठाण्यात या संदर्भात देशद्रोहाच्या अंतर्गत गुन्हा नोंद करण्याच्या संदर्भात तक्रार केली होती.