१. ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत समन्वयक ६३ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या कु. तेजल पात्रीकर यांनी ‘गायन, वादन आणि नृत्य या कलांद्वारे ईश्वरप्राप्ती होते’, याविषयी ध्वनीचित्र-चकती दाखवतांना काही दाखले दिले. त्या वेळी ‘मलाही अनिष्ट शक्तींचा त्रास असेल’, असे मला वाटले. मी रात्री खोलीत विश्रांती घेत असतांना ‘मला त्रास देणार्या अनिष्ट शक्तीचा परात्पर गुरु डॉ. आठवले सूक्ष्मातून नाश करत आहेत’, असे मला जाणवले.
२. ध्यानमंदिरात आरती चालू असतांना मला ‘सर्व देवतांचे आशीर्वाद मिळत आहेत’, असे वाटून माझ्या अंगावर रोमांच आले.
३. परात्पर गुरु डॉक्टरांच्या सत्संगात त्यांच्या दर्शनाने माझा भाव जागृत होऊन माझ्या डोळ्यांतून आनंदाश्रू येऊ लागले. त्यांच्याशी बोलतांना त्यांच्या डोळ्यांतूनही भावाश्रू येत असल्याचे मला जाणवले. माझे संपूर्ण शरीर मऊ वाटत होते.’
– डॉ. सुजीत कोशिरे, नाशिक (१२.३.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |