सातारा, २४ जानेवारी (वार्ता.) – अखिल भारत हिंदु महासभा, सातारा शाखेच्या वतीने थोर सेनानी, आझाद हिंद सेनेचे नेताजी सुभाषचंद्र बोस यांची १२५ वी जयंती साजरी करण्यात आली. नेताजींच्या पुतळ्यास हिंदु महासभेचे जिल्हाध्यक्ष धनराज जगताप, अधिवक्ता सतीश खानविलकर, अधिवक्ता दत्ता सणस, उमेश गांधी, विलास पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश गांधी यांनी, तर आभारप्रदर्शन संकल्प ओसवाल यांनी केले.