सोलापूर, लातूर, धाराशिव जिल्ह्यांमध्ये पोलीस आणि प्रशासनाला निवेदन : हिंदु जनजागृती समितीची ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’ मोहीम

सोलापूर येथील महसूलचे तहसीलदार दत्तात्रय मोहोळ यांना निवेदन देतांना समितीचे श्री. दत्तात्रय पिसे

सोलापूर, २३ जानेवारी (वार्ता.) – येथे प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने प्लास्टिकचे राष्ट्रध्वज आणि तिरंगा रंगाचा मास्क यांची विक्री करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करा, या मागणीचे निवेदन येथील जिल्हाधिकारी कार्यालयाला देण्यात आले. हे निवेदन जिल्हाधिकारी यांच्या वतीने महसूल विभागाचे तहसीलदार दत्तात्रय मोहोळ यांनी स्वीकारले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. दत्तात्रय पिसे यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

लातूर – येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पोलीस अधीक्षक कार्यालय आणि निवासी नायब तहसीलदार राजेश जाधव यांना निवेदन देण्यात आले.

फलटण (जिल्हा सातारा) – येथील तहसीलदार आणि पोलीस ठाणे येथे निवेदन देण्यात आले. या वेळी समितीचे स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.

धाराशिव – येथील निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांना निवेदन देण्यात आले. या वेळी समितीचे सर्वश्री संतोष पिंपळे, भगवान श्रीनामे, अमोल काकडे आदी उपस्थित होते.

धाराशिव येथील उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांना निवेदन देतांना समितीचे कार्यकर्ते