बेंगळुरू (कर्नाटक) – सामनानिश्चिती (मॅचफिक्सिंग) ही भारतीय घटनेच्या ४२० व्या कलमानुसार फसवणूक नाही. त्यामुळे यासंदर्भात फसवणुकीचा गुन्हा नोंदवता येणार नाही. सामनानिश्चितविषयी कारवाई करण्याचा अधिकार हा केवळ भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बी.सी.सी.आय.ला) आहे. यासंदर्भात ४२०व्या कलमानुसार गुन्हा नोंदवता येणार नाही, असा निर्णय कर्नाटक उच्च न्यायालयाना दिला.
Cricket Match Fixing Does Not Amount To Offence Of Cheating Under Section 420 IPC: Karnataka High Court Quashes FIR Against KPL Players @plumbermushi https://t.co/CXND2ikpXa
— Live Law (@LiveLawIndia) January 21, 2022
बेंगळुरू पोलिसांच्या गुन्हे शाखेने वर्ष २०१९ मध्ये ‘कर्नाटक प्रीमियर लीग ट्वेटी-२०’ क्रिकेट स्पर्धेमधील खेळाडू आणि संघ व्यवस्थापन सदस्य यांनी केलेला भ्रष्टाचार उघडकीस आणला होता. ३ खेळाडू आणि एका संघाच्या पदाधिकार्याच्या विरोधात सामनानिश्चितीचा गुन्हा नोंदवण्यात आला होता.