कोरोना निर्बंधांमुळे न्यूझीलंडच्या महिला पंतप्रधानांकडून स्वतःचे लग्न स्थगित !

भारतातील राजकारणी कोरोना निर्बंधांचे सर्रास उल्लंघन करून विवाह सोहळे आयोजित करत आहेत आणि प्रशासन त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी मूकदर्शक बनत आहे. यातून भारतातील राजकारणी कोणत्या पात्रतेचे आहेत, हे लक्षात येते ! – संपादक

पंतप्रधान जेसिंडा आर्डन

ऑकलंड (न्यूझीलंड) – न्यूझीलंडमध्ये कोरोनाच्या ओमिक्रॉन या प्रकाराच्या वाढत्या संसर्गामुळे अनेक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या निर्बंधांमुळे न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डन यांनी त्यांचे लग्न स्थगित करत असल्याची घोषणा केली.

याविषयी पंतप्रधान जेसिंडा म्हणाल्या, ‘‘देशातील अनेक नागरिक असे आहेत ज्यांना नव्या निर्बंधांमुळे, तसेच महामारीमुळे असे निर्णय घ्यावे लागले आहेत. मी त्यासाठी त्यांची क्षमा मागते.’