विस्थापित काश्मिरी हिंदूंसाठी करण्यात आलेला #Justice_4_KashmiriHindus ट्रेंड तृतीय स्थानी !

४० सहस्रांहून अधिक ट्वीट्स !

(‘ट्रेंड’ म्हणजे ट्विटरवर एका विषयावर घडवून आणलेली चर्चा)

मुंबई – १९ जानेवारी १९९० या दिवशी काश्मीरमध्ये २५ सहस्र मशिदींवरील भोंग्यांवरून हिंदूंना ‘इस्लाम धर्म स्वीकारा किंवा मरण्यासाठी सिद्ध व्हा’ अशा धमक्या दिल्या होत्या. या घटनेला ३२ वर्षे पूर्ण होऊनही काश्मिरी हिंदू अद्याप विस्थापितांचेच जीवन जगत आहेत.

काश्मिरी हिंदूंच्या विस्थापनदिना निमित्त १९ जानेवारी या दिवशी धर्मप्रेमी हिंदूंनी ट्विटरवर या हिंदूंचे पुनर्वसन करण्याच्या मागणीसाठी #Justice_4_KashmiriHindus नावाने ट्रेंड केला होता. हा ट्रेंड राष्ट्रीय स्तरावर तृतीय स्थानावर होता. यावर ४० सहस्रांहून अधिक ट्वीट्स करण्यात आले. यासह #KashmirExodus1990 आणि  #KashmiriPandits हे दोन ट्रेंड पहिल्या १० मध्ये ट्रेंड करत होते.