ह.भ.प. रवींद्र महाराज यांच्या अनुमतीमुळे हिंदु जनजागृती समितीकडून धर्मशिक्षणाचा प्रसार !

  • श्री रामकथा ज्ञानयज्ञ सप्ताहाचे आयोजन !

  • हिंदु जनजागृती समितीचे समन्वयक श्री. नीलेश टवलारे यांच्याकडून धर्माचरण करण्याचे आवाहन

श्री. नीलेश टवलारे

अमरावती, २० जानेवारी (वार्ता.) – अनमोल धार्मिक परंपरा टिकवून ठेवण्यासाठी धर्माचरण करणे आवश्यक आहे. आपल्या आचरणातून कुटुंबात संस्कार रुजवून या परंपरा सहजतेने टिकवून ठेवू शकतो. त्यासाठी ५ प्रकारे प्रयत्न करता येतील. घरातील सर्वांनी सायंकाळी दूरचित्रवाणी न पहाता देवासमोर बसून शुभं करोती किंवा श्लोक म्हणावेत. पुरुषांनी कपाळावर कुंकवाचा टिळा लावणे, स्त्रियांनी कपाळावर गोल कुंकू लावणे, भ्रमणभाषवर ‘हॅलो’ न म्हणता ‘हरि ॐ’ किंवा ‘नमस्कार’ म्हणावे. वाढदिवस दिनांकानुसार न करता तिथीनुसार साजरा करावा. सर्वांनी कुलदेवतेची उपासना करायला हवी; कारण कुलदेवता ही आपल्या कुळाची माता आहे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे समन्वयक श्री. नीलेश टवलारे यांनी अमरावती जिल्ह्यातील वडाळा (घाटखेडा) येथे ह.भ.प. रवींद्र महाराज पाटील यांनी आयोजित केलेल्या श्री रामकथा ज्ञानयज्ञ सप्ताहात केले. ह.भ.प. रवींद्र महाराज पाटील यांनी श्री. नीलेश टवलारे यांना ‘आचारधर्माचे पालन करणे’ या विषयावर मार्गदर्शन करण्याची विनंती केली होती. या वेळी ह.भ.प. रवींद्र महाराज पाटील यांना सनातन संस्थेचा ‘गुरुकृपायोग’ हा ग्रंथही दाखवण्यात आला.