१. भारताला अमली पदार्थांनी विळखा घालणे आणि यात मुसलमान राष्ट्रांचा मोठा सहभाग असणे
भारताच्या बंदरामध्ये २८.९.२०२१ या दिवशी २० सहस्र कोटी रुपयांचे ३ टन हेरॉईन हस्तगत करण्यात आले. भारतात हेरॉईन, एम्.डी., कोकेन, हशीश आदी अमली पदार्थांचे प्रमाण वाढत चालले आहे. या अमली पदार्थांची तस्करी मुख्यतः पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि इराण या देशांमधून होते. आजही अफगाणिस्तान हा अफू पिकवणारा प्रमुख देश म्हणून ओळखला जातो. जगात हेरॉईनचा ८० ते ९० टक्के पुरवठा तेथूनच होतो. भारतासाठी ही पुष्कळ मोठी डोकेदुखी आहे. तालिबान, अल्-कायदा, इसिस यांसारख्या जिहादी आतंकवादी संघटना अमली पदार्थांचा व्यापार करून बक्कळ पैसा मिळवतात आणि भारतातील तरुणांना मोठ्या प्रमाणावर व्यसनाधीन बनवतात. पुढे हाच पैसा आतंकवादी कारवायांसाठी वापरला जातो.
२. पंजाबमधील सैन्यदलातील तरुणांना व्यसनाधीन करून देशाला धोका निर्माण करण्याचे षड्यंत्र
आज देशात अनुमाने ६ कोटी ५० लाख लोक अमली पदार्थांच्या आहारी गेले आहेत. यात विशेषतः १८ ते ३५ वर्षे वयोगटातील तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. वर्ष २०१६ मध्ये ‘उडता पंजाब’ हा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला. त्यात या व्यसनाधीनतेवर बोट ठेवण्यात आले होते. व्यसनाधीनतेच्या माध्यमातून भारताच्या लष्करी सामर्थ्याला कमकुवत करण्याचा प्रयत्न पाककडून चालू आहे. सैन्यदलामध्ये पंजाबी तरुणांची संख्या लक्षणीय आहे. या पंजाबी तरुणांना लक्ष्य करण्यासाठी विविध पद्धती अवलंबल्या जात आहेत. शेतात ड्रोनच्या माध्यमातून अमली पदार्थांची पाकिटे टाकली जातात. पंजाबमधील तरुण मोठ्या प्रमाणावर व्यसनाधीन होणे, हे देशाला धोका निर्माण करणारे आहे. सुदैवाने मागील ४-५ वर्षांपासून देशातील अनेक भागांमध्ये होणारी अमली पदार्थांची तस्करी थांबवण्याचा प्रयत्न चालू आहे. सहस्रो कोटी रुपयांचे अमली पदार्थ हस्तगत केले जात आहेत.
३. अमली पदार्थविरोधी पथकाने अलिशान जहाजावर धाड टाकून अमली पदार्थांची मेजवानी (रेव्ह पार्टी) उधळून लावणे
३.१०.२०२१ या दिवशी अमली पदार्थविरोधी पथकाने (‘एन्.सी.बी.’ने) मुंबईहून गोव्याला जाणार्या ‘कॉर्डेलिया द एम्प्रेस’ या अलिशान जहाजावरील ‘रेव्ह पार्टी’ उधळून लावल्याचे वृत्त आले. हे क्रूझ समुद्राच्या मध्यभागी येताच मध्यरात्री अमली पदार्थविरोधी पथकाचे तत्कालीन विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी मेजवानी चालू होण्यापूर्वीच कारवाई करून ती उधळली. या प्रकरणी १० जणांना अटक करण्यात आली. यात उद्योगपती, अभिनेते अशा बड्या मंडळीचा समावेश होता. खरेतर हा सगळा प्रकार अमली पदार्थविरोधी पथकाला एक दिवस आधीच ठाऊक होता. त्यांनी १.१०.२०२१ या दिवशी मुंबईच्या विमानतळावरून ४ किलो ६०० ग्रॅम ‘इफिड्रिन’ कह्यात घेतले होते. त्याची एका गाडीतून ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड येथे तस्करी केली जाणार होती.
४. अमली पदार्थविरोधी पथकाने अभिनेते शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान याच्यासह ८ जणांना अमली पदार्थांसह अटक करणे
३.१०.२०२१ या दिवशी ‘कॉर्डेलिया द एम्प्रेस’ या आलिशान जहाजावरील ‘रेव्ह पार्टी’मध्ये अमली पदार्थविरोधी पथकाकडून जी कारवाई करण्यात आली, त्या वेळी दिग्गज अभिनेते शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान याला अटक करण्यात आली. हे वृत्त वृत्तपत्र आणि संकेतस्थळ यांनी अशा प्रकारे प्रसिद्धीस दिले की, जसे काही त्याने (आर्यनने) मोठा पराक्रमच केला ! त्याच्याकडून १३ ग्रॅम कोकेन, ५ ग्रॅम एम्डी,२१ ग्रॅम चरस, एम्.डी.एम्.च्या २२ गोळ्या आणि १ लाख ३३ सहस्र रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली. त्याच्या समवेत अन्य ८ जणांनाही अटक करण्यात आली. अमली पदार्थविरोधी पथकाला अशी बातमी मिळाली की, देहलीतील ‘एफ् टीव्ही इंडिया’ या मेजवानीचे आयोजक आहेत. तसेच ही अतिशय ‘हायप्रोफाइल’ समाजातील तरुण-तरुणींचा सहभाग असलेली मेजवानी, म्हणजे मौजमस्ती, मद्यपान, पाश्चात्त्य संगीतावर नृत्य आणि मुक्त लैंगिकता यांची सरमिसळ असते. पूर्वी ही मंडळी पुणे आणि अन्य निवांतस्थळी अशा मेजवान्या आयोजित करायची, या वेळी मात्र गोव्याला जाणार्या या आलिशान जहाजावर त्यांची मेजवानी चालू होणार होती. यात मोठ्या उद्योजकांची मुले आणि मोठी मंडळी सहभागी झाली होती.
हे सगळे झाल्यानंतर शाहरुख खान यांनी त्यांच्या पुत्राचा अपराध स्वीकारणे वगैरे तर दूरच राहिले, उलट ‘एन्.सी.बी’ केवळ नामवंतांच्या मागे लागते’, असा आरोप केला. त्यांना ही कल्पना नाही की, ‘सायकोट्रॉपिक सबस्टन्स कायदा १९८५’ मध्ये सुधारणा करून तो अधिक कठोर करण्यात आला आहे आणि त्यात काही कलमे वाढवण्यात आली आहेत. त्यामुळे केवळ सेवनच नाही, तर असे अमली पदार्थ जवळ बाळगणे आणि त्यांची विक्री करणे आदी सर्व दंडनीय गुन्हा मानण्यात आला आहे.
५. अभिनेते सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणामुळे अमली पदार्थविरोधी पथकाने महाराष्ट्रातील अमली पदार्थांचे मूळ उखडून टाकण्याचा प्रयत्न करणे
गेल्या अनेक वर्षांपासून आपण बघतो की, पंजाब, तसेच मुंबई, कोलकाता, देहली येथील तरुण पिढीला व्यसनाधीन बनवले जात आहे. त्यासाठी प्रतिबंधित असलेले अमली पदार्थ हे इस्लामी देशांमधून येतात. त्यात आपले शत्रूराष्ट्र असणार्या पाकिस्तानचा मोठा सहभाग असतो. या सर्व गोष्टी अभिनेते सुशांतसिंह राजपूत आणि त्याची स्वीय सचिव दिशा सालियन यांच्या आत्महत्या प्रकरणाच्या वेळी उघडकीस आल्या होत्या. या प्रकरणी न्यायालयाने ‘सीबीआय’द्वारे चौकशी करण्याचे आदेश दिले; परंतु सर्व पुरावे आधीच नष्ट करण्यात आल्यामुळे आणि सीबीआयकडे विलंबाने अन्वेषण गेल्यामुळे त्यात काहीच हाती लागले नाही. या प्रकरणामुळे अमली पदार्थविरोधी पथकाला मोठे काम मिळाले. त्यांनी अनेक दिवस मोठ्या प्रमाणावर धाडी टाकून अमली पदार्थ हस्तगत केले आणि त्यातील अनेक विक्रेते, दलाल आणि ग्राहक यांना अटक केली. तसेच त्यांच्यावर चांगल्या पद्धतीने चाप बसवला. यात वाईटातून चांगले झाले, असे म्हणता येईल.
सुशांतसिंह राजपूतची हत्या कि आत्महत्या येथपर्यंत सीबीआय पोचू शकली नाही; पण अमली पदार्थ सेवन करणारे, विक्रेते आणि दलाल हवालदिल झाले. यासमवेतच चित्रपटसृष्टीशी त्यांचे असलेले संबंध उघड झाले. आता पुन्हा एकदा खानावळीतील एका खानाचा मुलगा यात सापडल्याने अमली पदार्थ प्रकरणाशी चित्रपटसृष्टीचा फार जवळून संबंध आहे, हे लक्षात येते.
६. देशवासियांनी अमली पदार्थविरोधी पथकाच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले पाहिजे !
सध्या अमली पदार्थविरोधी पथक निश्चितच अतिशय चांगले काम करत आहे. ते सातत्याने कोट्यवधी रुपयांचे अमली पदार्थ हस्तगत करत असते. या अमली पदार्थांमुळे आपण पंजाबसारखा चांगला प्रांत आणि भारत देशातील कर्तबगार तरुण मुले गमावत आहोत. या लेखातून वैयक्तिकपणे चित्रपटसृष्टीतील नट-नट्यांच्या विरोधात टीका करायची नाही, तर त्यामागे आपला समाज अमली पदार्थांच्या विळख्यात अडकत चालला आहे, त्या समाजाला जागृत करण्याचा उद्देश आहे. तरुण पिढीसाठी आदर्श असणारे अभिनेते आणि खेळाडू जर चुकीचे कृत्य करत असतील, तर साहजिकच त्यांचा आदर्श देशातील तरुणाई घेईल अन् ती या अमली पदार्थांच्या नादी लागेल, जे भारताच्या भवितव्यासाठी योग्य नाही. अमली पदार्थांचे दलाल, पाकिस्तान आणि जगभरातील जिहादी आतंकवादी संघटना आपल्या देशातील शूर अन् कर्तबगार मुलांना व्यसनांच्या विळख्यात जखडवत आहेत. ज्यांच्याकडून देशसेवेची अपेक्षा आहे, अशा लोकांना या अमली पदार्थांच्या नादी लावणे, हे या मंडळीचे प्रयत्न आहेत. यातून आपल्या देशाला वाचवणे आवश्यक आहे. त्यासाठी आपण अमली पदार्थविरोधी पथकाच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले पाहिजे.
श्रीकृष्णार्पणमस्तु’ ।
– (पू.) अधिवक्ता सुरेश कुलकर्णी, संस्थापक सदस्य, हिंदु विधीज्ञ परिषद आणि अधिवक्ता, मुंबई उच्च न्यायालय. (६.१०.२०२१)
चित्रपटसृष्टीतील खानावळीची राष्ट्रविघातक वर्तणूक
चित्रपटसृष्टीतील खान कशा पद्धतीने वागतात, हे बघूया. ४ पैकी ३ खानांनी ‘लव्ह जिहाद’ कसा करावा ? हा आदर्शच धर्मांधांसमोर ठेवला आहे. या तिघांनीही (अभिनेते आमीर खान, शाहरुख खान आणि सैफ अली खान यांनी) हिंदु महिलांशी लग्न केले.
अ. त्यांचे आदर्श युसूफ खान (दिलीप कुमार) आहेत, जे पाकिस्तानात जाऊन ‘निशान-ए-पाकिस्तान’ हा पुरस्कार घेऊन आले. जे शत्रूराष्ट्र गेली ७४ वर्षे भारताला जर्जर करत आहे, त्या पाकिस्तानमध्ये जाऊन यांनी पुरस्कार स्वीकारला. यावरूनच तुमची देशनिष्ठा समजते.
आ. आणखी एक चित्रपट अभिनेते (आमीर खान) तुर्कस्तानात जाऊन तुर्कस्तानच्या शासनकर्त्यांना भेटले. तुर्कस्तान सकाळ-संध्याकाळ ‘काश्मीरशी भारताचा संबंध नाही आणि तो पाकिस्तानला द्यायला पाहिजे’, ‘कलम ३७० परत लावले पाहिजे’, अशा पाकधार्जिण्या वल्गना करत असतो. (कलम ३७० मुळे जम्मू-काश्मीर विशेष स्वायत्तता असलेले राज्य होते, तसेच यामुळे राष्ट्रपतींना राज्याची घटना विसर्जित करण्याचाही अधिकार नव्हता. हे कलम केंद्रशासनाने आता रहित केले आहे.) अशा तुर्कस्तानच्या शासनकर्त्यांना जाऊन भेटणे, हे कितपत योग्य आहे ?
याव्यतिरिक्त ही खानावळ जेव्हा कधी संधी मिळेल, तेव्हा चित्रपट, विज्ञापने यांच्या माध्यमातून हिंदूंच्या श्रद्धास्थानांची टिंगलटवाळी करत असते. नुकतेच आमीर खान यांनी दिवाळीच्या पूर्वीच ‘रस्ते फटाके फोडण्यासाठी नाहीत, तर वाहनांसाठी आहेत’, असा संदेश ‘सिएट टायर’च्या विज्ञापनातून दिला. त्यांना बकरी ईदच्या पूर्वी ‘पर्यावरणाची हानी करू नये’, असे म्हणतांनाकधी बघितले नाही.
– (पू.) अधिवक्ता सुरेश कुलकर्णी, संस्थापक सदस्य, हिंदु विधीज्ञ परिषद आणि अधिवक्ता, मुंबई उच्च न्यायालय. (६.१०.२०२१)