पौष कृष्ण पक्ष तृतीया (२१.१.२०२२) या दिवशी सनातनचे २५ वे संत पू. पृथ्वीराज हजारे यांचा ६३ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त कु. प्रार्थना महेश पाठक (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय १० वर्षे) हिला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
‘१६.१.२०२२ या दिवशी मला पू. हजारेकाकांची पुष्कळ आठवण येत होती. मी त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मला त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती लिहिल्या. त्यानंतर ‘पू. हजारेकाकांचा वाढदिवस जवळ आला आहे’, असे मला समजले.
पू. पृथ्वीराज हजारे यांच्या चरणी ६३ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
१. रात्री ग्रंथ वाचत असतांना पू. हजारेकाकांनी प्रीतीमय दृष्टीने पहाणे आणि ‘कोणता ग्रंथ वाचत आहे ?’, हे जाणून घेणे
मी रामनाथी आश्रमात असतांना रात्री तिसर्या माळ्यावरील परिसरात बसून ग्रंथवाचन करायचे. पू. हजारेकाका तेथूनच त्यांच्या खोलीत जायचे. त्यामुळे माझी पू. काकांशी भेट व्हायची. ते ‘मी कोणता ग्रंथ वाचत आहे ?’, हे आवर्जून पहायचे. तेव्हा त्यांची प्रीतीमय दृष्टी पाहून मला अतिशय आनंद होत असे. खरेतर त्यांना पुष्कळ सेवा असतात. ते अतिशय उच्च पातळीचे संत आहेत. असे असूनही ते माझी काळजी घ्यायचे. त्याबद्दल त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !
२. सारणी लिखाण करतांना तिथे अंधूक प्रकाश असल्यास चांगला प्रकाश असलेल्या ठिकाणी बसायला सांगणे
मी ज्या आसंदीवर बसून स्वभावदोष आणि अहं यांची सारणी लिहायचे, तेथे कधी कधी प्रकाश अल्प असायचा. माझ्या ते लक्षात यायचे नाही. त्या वेळी पू. काका मला जिथे प्रकाश चांगला आहे, अशा ठिकाणी बसायला सांगायचे किंवा मी बसलेल्या आसंदीवरील दिवा लावायचे.
३. पू. हजारेकाकांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती
अ. पू. काका मार्गिकेतून चालत यायचे, तेव्हा मला ‘प.पू. गुरुदेवच (परात्पर गुरु डॉ. आठवलेच) येत आहेत’, असे जाणवायचे. त्यांच्या पुष्कळशा कृती प.पू. गुरुदेवांप्रमाणेच आहेत.
आ. त्यांच्या विविध भावमुद्रा आहेत. ते कधी ऋषीमुनींप्रमाणे ज्ञानी वाटतात, तर कधी लहान बालकाप्रमाणे निरागस होऊन हसतात.
संत जरी दिसती निराळे ।
तरी ते गुरुतत्त्वाशी एकरूप झाले ।
अस्तित्वानेच त्यांच्या ।
साधकजन आनंदित झाले ।।
– गुरुदेवांचे आनंदी फूल,
कु. प्रार्थना महेश पाठक (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय १० वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१६.१.२०२२)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |