पटोलेंवर गुन्हा नोंद करा ! – भाजपचे पोलीस ठाण्यात निवेदन

सांगली शहर पोलीस ठाण्यात निवेदन देतांना भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते

सांगली, १८ जानेवारी (वार्ता.) – काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देशाचे पंतप्रधान यांच्याविषयी एकेरी भाषेत आणि अत्यंत घृणास्पद असे वक्तव्य केले आहे.

देशाच्या पंतप्रधानांविषयी जाहीरपणे त्यांना मारण्याची आणि शिव्या देण्याची भाषा वापरणे निंदनीय आहे. नुकताच पंजाबमधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेच्या संबंधी घडलेला अपप्रकार पहाता, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गुन्हा नोंद करा, या मागणीसाठी भाजपच्या वतीने सांगली शहर पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले. हे निवेदन ठाणे अंमलदार यांनी स्वीकारले. या वेळी भाजप महानगर अध्यक्ष श्री. दीपक शिंदे, सरचिटणीस श्री. केदार खाडिलकर, श्री. अमर पडळकर यांसह अन्य उपस्थित होते.