सांगली जिल्ह्यातील २७ नवीन पाणीपुरवठा योजनांना प्रशासकीय मान्यता ! – डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी

पाणीपुरवठा योजना

सांगली, १८ जानेवारी (वार्ता.) – ग्रामीण भागातील जनतेला शुद्ध आणि मुबलक पाणी मिळावे यासाठी जिल्ह्यात २७ नवीन पाणीपुरवठा योजनांना प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे. यासाठी अंदाजपत्रकीय रक्कम २८ कोटी रुपये ९८ लाख १६ सहस्र रुपये असून यातून ८ सहस्र १४७ नळजोडण्या करण्यात येतील. ज्या गावांमध्ये यापूर्वी शासनाच्या पाणीपुरवठा योजना अस्तित्वात आहेत किंवा नाहीत त्यांची कार्यकारी अभियंता यांनी समक्ष भेट देऊन पहाणी करून प्रस्ताव सादर करावेत, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृहात ‘जिल्हा पाणीपुरवठा आणि स्वच्छता मिशन समिती’ची आढावा बैठक जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्या वेळी त्यांनी हे आदेश दिले. या वेळी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.