‘दारुल उलूम देवबंद’च्या संकेतस्थळाची चौकशी करा ! – राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाकडून उत्तरप्रदेश प्रशासनाला निर्देश

‘देवबंद’कडून त्यांच्या संकेतस्थळाद्वारे दिल्या जाणार्‍या अवैध फतव्यांचे प्रकरण

  • अशा फतव्यांविषयी पुरो(अधो)गामी चकार शब्दही काढत नाहीत, हे लक्षात घ्या ! – संपादक
  • असे निर्देश का द्यावे लागतात ? प्रशासन स्वतःहून याविरोधात कारवाई का करत नाही ? – संपादक

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – ‘दारुल उलूम देवबंद’ संघटनेकडून दिल्या जाणार्‍या अवैध आणि दिशाभूल करणार्‍या फतव्यांच्या प्रकरणी त्यांच्या संकेतस्थळाची सखोल चौकशी करावी, असे निर्देश राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने उत्तरप्रदेश सरकारला दिले. दारुल उलूम देवबंदच्या संकेतस्थळावरील फतवे हे थेट देशातील कायद्यांच्या विरोधात आहेत, अशी तक्रार राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाकडे करण्यात आली होती. त्यानुसार आयोगाने वरील निर्देश दिले.

संकेतस्थळाची तपासणी केल्यानंतर आयोगाच्या लक्षात आले की, लोकांनी उपस्थित केलेल्या तक्रारींवर देवबंदकडून देण्यात आलेली उत्तरे देशातील कायदे आणि नियम यांनुसार नाहीत. बेकायदेशीर विधाने, हिंसाचार, गैरवर्तन, छळ आणि मुलांमध्ये भेदभाव करणार्‍या घटनांचा प्रसार रोखणे यांसाठी संकेतस्थळावरील अशी सामग्री काढून टाकली पाहिजे. तोपर्यंत हे संकेतस्थळ बंद ठेवले पाहिजे. आयोगाने राज्य सरकारला दारुल उलूम देवबंदच्या विरोधात आवश्यक कारवाई करण्यास आणि येत्या १० दिवसांत कारवाईचा अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे