१. संपूर्ण विश्वात परिवर्तन करण्यासाठी भारतालाच कारणीभूत व्हावे लागेल !
‘त्रेतायुगामध्ये विश्वयुद्धाचे कारण भारतवर्ष होता, द्वापारयुगातही विश्वयुद्धाचे कारण भारतवर्षच होता आणि आता या वेळीही भारतालाच विश्वयुद्धाचे कारण बनावे लागेल. संपूर्ण विश्वात परिवर्तन करण्यासाठी आता भारतालाच निमित्त व्हावे लागेल.
२. संपूर्ण विश्वात कलह निर्माण होऊन इस्लामी राष्ट्रे आणि चीन नामशेष होतील अन् छोटे देश मोठ्या देशात विलीन होतील !
इस्लामी राष्ट्रांमध्ये फार मोठा कलह निर्माण होईल आणि तेथील अनेक लोक आपापसांत लढून संपतील. अनेक छोटे छोटे देश मोठ्या राष्ट्रांमध्ये समाविष्ट होतील. या सर्वांचे भारत नेतृत्व करील. चीनच्या सर्व वैज्ञानिक प्रगतीचा अहंकार नष्ट करून चीन नामशेष केला जाईल. यातून वाचलेल्या चीनमधील लोकांना भारत साहाय्य करील. या वेळी तिबेट पुन्हा भारतात विलीन होईल.
३. जगातील सर्व देशांनी मिळून भारतावर आक्रमण केले, तरीही ते भारताला जिंकू शकणार नसणे !
जगातील सर्व राष्ट्रांनी एकत्रित होऊन भारतावर आक्रमण केले, तरीही कुणीही भारत जिंकू शकणार नाही. भारतामध्ये मुळापासून पालट करून नव्याने सर्वांचे संघटन केले जाईल.
४. अन्य राष्ट्रांनी कितीही प्रयत्न केले, तरीही जागतिक सुरक्षा परिषद भारतातच येणार असणे !
‘जागतिक सुरक्षा परिषद अमेरिकेमधून भारतामध्ये जाऊ नये’, यासाठी जगातील सर्व राष्ट्रांनी प्राण पणाला लावून प्रयत्न केले, तरीही त्यांना ते थांबवणे शक्य होणार नाही. भविष्यात जागतिक सुरक्षा परिषद भारतामध्येच येईल.
५. संपूर्ण विश्वात परिवर्तन करणार्या या महापुरुषाचा जन्म भारतातील एका छोट्या गावात झालेला असणे आणि संपूर्ण विश्वात तो नव्याने रचनात्मक पालट करील !
संपूर्ण मानवजातीच्या इतिहासात अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार्या या महापुरुषाचा जन्म भारतातील एका छोट्या गावामध्ये झाला आहे. आजपर्यंत कुणालाही मिळाले नाही, इतके प्रचंड समर्थन त्याला जनतेकडून मिळेल. तो महापुरुष समाजात नव्याने रचनात्मक पालट करील. ते पालट संपूर्ण विश्वातील देशांत केले जातील. त्याचा एक झेंडा आणि एक भाषा असेल.’
(संदर्भ : शाकाहारी पत्रिका (२८.८.१९७१))