अलगीकरणाच्या नावाखाली चीन तेथील लोकांना धातूच्या अत्यंत छोट्या खोल्यांमध्ये करत आहे बंद !

‘झीरो कोराना पॉलिसी’ (कोरोनाबाधित रुग्णसंख्या शून्य करण्यासाठीचे धोरण) या नावाखाली कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी चीनची अमानवीय कृती

भारतात असहिष्णुता वाढत आहे’, अशी आवई उठवणार्‍या जगभरातील  मानवाधिकार संघटना चीनमधील लोकांच्या विरोधात अशी अमानवीय कृती होत असतांना कुठे लपून बसतात ? – संपादक

अलगीकरणासाठी तयार केलेल्या धातूच्या छोट्या खोल्या

बीजिंग – कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी चीन तेथील नागरिकांवर अत्याचार करत आहेत. बीजिंग येथे पुढे येऊ घातलेल्या ‘ऑलिंपिक’ स्पर्धेच्या दृष्टीने ‘झीरो कोराना पॉलिसी’ (कोरोनाबाधित रुग्णसंख्या शून्य करण्यासाठीचे धोरण) या नावाखाली तेथील प्रशासन अनेकांना धातूच्या अत्यंत छोट्या खोल्यांमध्ये २१ दिवसांसाठी बंद करत आहे. याला विरोध करणार्‍यांना कारागृहात डांबण्यात येत आहे. या संदर्भात ‘डेलीमेल’ या वृत्तपत्राने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे, तसेच सामाजिक माध्यमात प्रसारित झालेल्या ‘व्हिडिओ’च्या माध्यमातूनही हा प्रकार उघडकीस आला आहे, ज्यामध्ये धातूच्या अत्यंत छोट्या खोल्या दिसत असून बाहेर ‘पीपीई किट’ परिधान केलेले काही लोक साहित्य वाटतांना दिसत आहेत.

या अहवालानुसार चीनमधील जियान, अनयांग आणि यूजोहू येथे कोरोनाबाधित लोकांना पकडून या अलगीकरण केंद्रांमध्ये पाठवले जात आहे. आतापर्यंत एकूण २ कोटी लोकांना पकडून या खोल्यांमध्ये ठेवण्यात आले आहे. यातील १.३ कोटी लोक हे जियानमधील आहेत. अलगीकरणातून बाहेर आलेल्या लोकांचे म्हणणे आहे की, एखादी व्यक्ती कोरोनाने संक्रमित असेल, तरी त्या परिसरातील सर्वांनाच या अलगीकरण केंद्रांमध्ये ठेवले जात आहे. तेथून बाहेर आलेल्या लोकांनी सांगितले, ‘‘रातोरात अनेक लोकांना येथे आणले गेले. या वयस्कर आणि लहान मुले यांचाही समावेश होता. या खोल्यांमध्ये काहीही ठेवलेले नाही. अनेक दिवस आम्हाला बघण्यासाठी कुणीही आले नाही.