मुसलमान मुलगी आणि हिंदु मुलगा यांच्या प्रेमसंबंधात हाहाःकार उडाल्यावर मूग गिळून बसणारे धर्मनिरपेक्षतावादी !

नाशिक येथील एका श्रीमंत सराफ व्यावसायिकांची मुलगी रसिका हिचा विवाह मुसलमान युवक आसिफ याच्याशी झाला. ‘हा विवाह लव्ह जिहाद आहे किंवा नाही ?’, हे कालांतराने कळेल; तरीही या विवाहाच्या निमित्ताने पुन्हा एकदा ‘लव्ह जिहाद’चा विषय चर्चेत आला. ‘लव्ह जिहाद’ या विषयाची व्याप्ती आणि विविध पैलू लक्षात आणून देणारी ही लेखमालिका ‘असे विवाह म्हणजे एक प्रकारे हिंदूंच्या अस्तित्वाचा प्रश्न कसा आहे ?’, हे लक्षात आणून देईल !

मागील भागात आपण या विवाहाचे परिणाम, प्रसारमाध्यमांची भूमिका, लव्ह जिहादचा इतिहास आदी सूत्रे पाहिली. त्यापुढील सूत्रे आज पाहू.      

(भाग २)

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/542905.html

श्री. शंकर गो. पांडे

लेखक – शंकर गो. पांडे, पुसद, यवतमाळ


केरळमध्ये मुख्यमंत्र्यांच्या चौकशीच्या आदेशानंतर शेकडो, तर कर्नाटकात गुन्हे अन्वेषण विभागाच्या चौकशीनंतर लव्ह जिहादची सहस्रो प्रकरणे आढळणे !

भारतात जेव्हा लव्ह जिहादचा आरोप होतो, तेव्हा ‘हा प्रकार अस्तित्वातच नाही’, असे म्हणणार्‍या हिंदुद्वेष्ट्यांचा या देशात तुटवडा होत नाही. लव्ह जिहादची आग स्वतःच्या घरापर्यंत पोचली, तरी हिंदुद्वेषाने आंधळे झालेले हे लोक याचे अस्तित्व मान्य करतील, याची शक्यता नाही. काही वर्षांपूर्वी केरळ उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती के.टी. शंकरन् यांनी लव्ह जिहादचे अस्तित्व मान्य करून त्या वेळेचे केरळचे मुख्यमंत्री  अच्युतानंदन यांना त्याची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. तेव्हा त्यांना लव्ह जिहादची शेकडो प्रकरणे आढळून आली होती. काही वर्षांपूर्वी कर्नाटक उच्च न्यायालयात लव्ह जिहादमध्ये फसलेल्या एका तरुणीने खटला प्रविष्ट केला होता. या खटल्याच्या  निमित्ताने कर्नाटकच्या गुन्हे अन्वेषण विभागाने (‘सीआयडी’ने) चौकशी केली असता ‘एकट्या कर्नाटकात प्रतिवर्षी अनुमाने ३६ सहस्र हिंदु मुली लव्ह जिहादला बळी पडतात’, असे दिसून आले.

लव्ह जिहादसाठी अनेक मार्गांचा वापर करणारे पाताळयंत्री धर्मांध !

प्रतिकात्मक छायाचित्र

‘भारतात प्रतिवर्षी सहस्रो हिंदु मुली लव्ह जिहादच्या बळी ठरतात’, हे वास्तव आहे. मध्यंतरी हिंदु धर्मातील कोणत्या जातीच्या मुलीला लव्ह जिहादच्या जाळ्यात फसवणार्‍या मुसलमान तरुणाला किती लाखांचे पारितोषिक मिळेल, याचे एक मूल्य(दर)पत्रकच प्रसिद्ध झाले होते. ‘हिंदु मुलींना जाळ्यात अडकवण्यासाठी साम, दाम, दंड, भेद या सर्वच मार्गांचा वापर करण्यात येतो’, हेही दिसून आले आहे. हिंदु नाव आणि हिंदु वेश धारण करणे, कपाळावर टिळा लावणे इत्यादी मार्गाने अनेक हिंदु मुली लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकल्या आहेत. विस्तारभयास्तव याची काही मोजकीच उदाहरणे देतो.

राष्ट्रीय पातळीवरील खेळाडूही लव्ह जिहादच्या बळी !

रकीबुल हसन व तारा सहदेव

भारताच्या राष्ट्रीय पातळीवरच्या ‘शूटर’ तारा सहदेव अशा पाताळयंत्री लव्ह जिहादच्या बळी ठरल्या. वर्ष २०१८ मध्ये हे प्रकरण प्रसिद्धी माध्यमातून गाजले. ‘रणजीत कोहली’ या तरुणाने ताराला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. ७ जुलै २०१४ या दिवशी त्यांचा हिंदु पद्धतीने विवाहही झाला; पण नंतर रणजीत हा हिंदु नसून त्याचे खरे नाव रकीबुल हसन असल्याचे सिद्ध झाले. इतकेच नव्हे, तर त्याची आई कौसर हिनेही तिचे नाव ‘कौसल्या’ आहे, असे सांगून ताराला फसवण्याच्या षड्यंत्राला साहाय्य केले होते.

हिंदु मुलगी आणि मुसलमान मुलगा यांच्या विवाहानंतर नेहमी जो प्रकार होतो, तोच तारा यांच्या संदर्भातही झाला. ‘तिने मुसलमान धर्म स्वीकारावा’ म्हणून त्यांचा अनन्वित छळ चालू झाला. त्यांना अनेकदा अमानुष मारहाणही करण्यात आली. शेवटी हा छळ असह्य होऊन तारा यांनी ६ जानेवारी २०१८ या दिवशी झारखंडमधील रांची येथील न्यायालयात घटस्फोटासाठी याचिका केली आणि ती मान्यही झाली.

‘लव्ह जिहाद अस्तित्वात नाही’, असे म्हणणार्‍यांनी याचे उत्तर द्यावे !

एप्रिल २०२१ मध्ये उत्तरप्रदेशच्या अलिगढमध्ये मूळ नाव अफझल असणार्‍या मुसलमान तरुणाने ‘अशोक राजपूत’ असल्याचे सांगून हिंदु मुलीशी विवाह केला, तर जून २०२१ मध्ये आझमगढ येथील मूळ नाव आबिद असतांना त्याने स्वतःची ओळख ‘इन्स्पेक्टर (पोलीस निरीक्षक) आदित्य सिंह’ अशी करून देत एका हिंदु मुलीला फसवले. विशेष म्हणजे या आबिदचे आधीच दोन विवाह झालेले होते आणि तो दोन मुलांचा बापही होता. आझमगढ येथील या तिसर्‍या विवाहानंतरही त्याचे समाधान झाले नव्हते. यानंतर तो मध्यप्रदेशात गेला आणि तेथेही त्याने हिंदु नाव धारण करून एका हिंदु मुलीशी चौथा विवाह केला. याला लव्ह जिहाद नाही, तर काय प्रेमविवाह म्हणायचे ? ‘लव्ह जिहाद अस्तित्वात नाही’, असे म्हणणार्‍यांनी या प्रश्नाचे उत्तर दिले पाहिजे. सध्या अफझल आणि आबिद उत्तरप्रदेश शासनाने सिद्ध केलेल्या लव्ह जिहादविरोधी कायद्याच्या अंतर्गत कारागृहात आहेत.

मुसलमान मुलगी आणि हिंदु मुलगा असे प्रेमसंबंध जुळल्यास हाहाःकार उडतो !

लव्ह जिहादच्या तथाकथित प्रेमाची वाहतूक धर्माच्या संदर्भात एकेरी (एकतर्फी) असते. हिंदु मुले अशा प्रकारे अन्य धर्मीय मुलींना कधीही फसवत नाहीत. त्यांच्यावरचे संस्कार त्यांना असे करू देत नाहीत. एखाद्या प्रकरणात हिंदु मुलगा आणि मुसलमान मुलगी यांचे प्रेमसंबंध जुळल्याचे दिसून येते. असे एखादे प्रकरण जेव्हा उघडकीस येते, तेव्हा मात्र हाहाःकार उडतो. ‘इस्लाम खतरेमें’ येतो आणि अशा प्रेमसंबंधाची परिणती शेवटी कशात होते ? एकतर दोघांपैकी एकाला, तर काही वेळा दोघांनाही ‘अल्लाला प्यारे’ व्हावे लागते. अशा प्रकारची अनेक उदाहरणे देता येतील; पण विस्तारभयास्तव तीनच उदाहरणे प्रस्तुत करतो.

मुसलमान मुली आणि हिंदु मुले अशा प्रेमप्रकरणांत मुलीची किंवा मुलाची हत्या केली जाणे, तर अमरावतीत अशा एका प्रकरणामुळे दंगलसदृश स्थिती होणे !

मुंबई येथील नागपाडा वस्तीत रहाणार्‍या एका १८ वर्षीय मुसलमान मुलीचे एका हिंदु तरुणाशी प्रेमसंबंध जुळले होते. घरच्यांनी विरोध करूनही ती मुलगी हिंदु मुलाशीच विवाह करण्याचा हट्ट धरून बसली होती. शेवटी एक दिवस मुलीच्या बापाने ती झोपेत असतांनाच तिच्यावर अमानुषपणे कुर्‍हाडीचे अनेक घाव घालून तिला ठार केले. दुसरी घटना ऑगस्ट २००९ मधील यवतमाळ जिल्ह्यातील एका तालुकास्तरावरील गावातील आहे. एकाच वस्तीत रहाणार्‍या एका हिंदु मुलाचे आणि मुसलमान मुलीचे प्रेमसंबंध जुळून आले; पण काही कट्टर धर्मांधांना हे संबंध मान्य नव्हते. त्यांनी त्या प्रेमीयुगुलावर पाळत ठेवून एके दिवशी ते युगुल नदीकाठी बसले असतांना त्यांना गाठले. त्यांनी मुलीला पळवून लावले आणि मुलाला अमानुष मारहाण करून नदीत फेकून दिले. त्यात त्या मुलाचा मृत्यू झाला. तिसरी घटना यवतमाळ जिल्ह्यात वर्ष २०१२ मध्ये घडलेली आहे. एक हिंदु मुलगा मुसलमान मुलीशी बोलत असल्याचे पाहून तिच्या बापाचा राग अनावर झाला आणि त्याच्या सांगण्यांवरून त्याच्या पुतण्यांनी त्या कोवळ्या हिंदु तरुणाची दगडाने ठेचून निर्घृणपणे हत्या केली. नंतर त्याच्या मृत शरिरावर पेट्रोल टाकून त्याला जाळून टाकले; पण हिंदुद्वेष्ट्यांचा निर्लज्जपणा एवढा की, ते हिंदूंवरच कट्टरतेचा ठपका मारतात. प्रत्यक्षात जे कट्टर आहेत त्यांना कट्टर म्हणण्याएवढेही धाडस त्यांच्यामध्ये नसते.

धर्मनिरपेक्षतेच्या वल्गना करणारे नेते मुसलमान मुलगी आणि हिंदु मुलगा अशा विवाहांच्या प्रकरणात कधीच पुढाकार घेत नाहीत !

मला याचे मोठे नवल वाटते आणि संतापही येतो की, अशा वेळी ‘गंगा-जमनी तहजीब’च्या (सर्वधर्मसमभाव किंवा हिंदु-मुसलमान यांचा सलोखा) मोठमोठ्या वल्गना करणारे आमच्या हिंदु समाजाचे नेते कुठे तोंड लपवून बसलेले असतात. अशा विवाहाला विरोध करणार्‍यांना ते कायदेशीर कार्यवाहीची चेतावणी का देत नाहीत ? हिंदु मुलगा आणि मुसलमान मुलगी यांच्या प्रेमविवाहाला विरोध झाला, तर मध्यस्थाची भूमिका घेऊन असा विवाह सुखरूपपणे पार पडावा; म्हणून एखादा मुसलमान नेता, आमदार, खासदार किंवा मंत्री पुढाकार घेतांना कधीच दिसत नाही; कारण त्यांच्यात त्यांच्या समाजाच्या विरोधात जाण्याचे धाडसच नसते ! याच्या नेमका उलटा प्रकार म्हणजे मुसलमान मुलगा आणि हिंदु मुलगी असेल, तर त्यांचा विवाह निर्विघ्नपणे पार पडावा; म्हणून हिंदु पुढारी अहमहमिकेने पुढे येतात. काय कारणे असावीत यामागे ? मतांची लालसा कि मुसलमान कट्टरतेसमोर शरणागती स्वीकारण्याची अंगात मुरलेली वृत्ती, स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवून घेण्याची हौस कि हिंदूंमधील कट्टरतेचा अभाव कि ‘मला काय त्याचे ?’, या आत्मघातकी वृत्तीचा प्रभाव ?


हे पण वाचा –

‘लव जिहाद’ रोकनेके उपाय तथा हिन्दू समाजको आवाहन

 लव जिहाद : हिन्दू युवतियों, स्त्रियों तथा अभिभावकों के लिए ध्यान में रखनेयोग्य सावधानियां

 लव जिहाद : हिन्दू युवतियो, झूठे प्रेमकी बलि चढकर आत्मघात न करो !

 ‘लव जिहाद’का प्रसार तेजीसे होनेके कुछ कारण

हे चारही लेख वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://www.hindujagruti.org/hindi/hindu-issues/love-jihad


या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/543400.html