अफगाणिस्तानमधील बाँबस्फोटात ९ मुलांचा मृत्य, तर ४ जण गंभीर घायाळ

प्रतिकात्मक छायाचित्र

काबूल – पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्या सीमेवर अफगाणिस्तानच्या सीमेत  १० जानेवारीला दुपारी झालेल्या बाँबस्फोटात ९ मुलांचा मृत्यू झाला, तर ४ जण गंभीर घायाळ झाले. या घटनेला अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारने दुजोरा दिला आहे.

तालिबानच्या शासनाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनानुसार नांगरहारमध्ये खाद्यपदार्थ घेऊन जाणार्‍या वाहनामध्ये लालोपूर जिल्ह्याच्या चौकीजवळ हा स्फोट झाला. या वाहनात उखळी तोफा लपवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.