कोईंबतूर (तमिळनाडू) – अज्ञातांकडून येथील एन्.व्ही. रामासामी पेरियार यांच्या पुतळ्याला चपलांचा हार घालण्यासह त्यांच्या डोक्यावर भगवा रंग टाकल्याची घटना ९ जानेवारीला घडली. ही मूर्ती येथील ‘पेरियार स्टडी सेंटर’च्या समोर आहे. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यावर त्यांनी पुतळ्याला घातलेला हार हटवून त्याची स्वच्छता केली. या घटनेच्या विरोधात द्रविड कळघम् (द्रविड संघ) संघटनेकडून निदर्शने करण्यात आली. पोलीस सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहेत.
TN: Periyar statue defaced with saffron powder, garlanded with slippers in Coimbatore https://t.co/lupA69cy9v
— Republic (@republic) January 10, 2022
कोण होते एन्.व्ही. रामासामी पेरियार ?एन्.व्ही. रामासामी पेरियार हे हिंदुद्वेषी व्यक्ती होते. वर्ष १८७४ ते १९७३ या त्यांच्या ९९ वर्षांच्या जीवनकाळात त्यांनी ब्राह्मणांच्या विरोधात द्वेष पसरवण्याचे कार्य केले. तसेच दक्षिण भारताला उर्वरित भारतापासून स्वतंत्र करण्याविषयीचे विचार परसवले. ते इंग्रजांचे समर्थक होते. तमिळनाडूत त्यांना ‘द्रविड आंदोलनाचे जनक’ मानले जाते. त्यांच्या समर्थकांनी १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी काळे झेंडे दाखवून ‘स्वातंत्र्यदिन’ हा शोक दिवस म्हणून साजरा केला. त्या दिवशी चेन्नईमध्ये हे समर्थक काळे कपडे घालून फिरत होते. त्यांचे म्हणणे होते की, हे स्वातंत्र्य खरे नाही ! पेरियार यांनी ‘द्रविड कळघम्’ संघटनेची स्थापना केली. तमिळनाडूतील प्रसिद्ध चित्रपट अभिनेते रजनीकांत यांनी काही काळापूर्वीच पेरियार यांच्यावर टीका करतांना म्हटले होते की, पेरियार हिंदु देवतांवर टीका करत होते. त्यांनी वर्ष १९७१ मध्ये म्हणजे वयाच्या ९७ व्या वर्षी तमिळनाडूतील सलेम येथे अंधश्रद्धा निर्मूलन संमेलनाच्या वेळी भगवान श्रीराम आणि माता सीता यांची आक्षेपार्ह चित्रे दाखवली होती. रजनीकांत यांच्या या पेरियारविरोधी विधानाविषयी त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला, तरी त्यांनी क्षमा मागितली नाही. |