संघ मुख्यालयाची रेकी केल्याचे प्रकरण गांभीर्याने घ्यायला हवे ! – विरोधी पक्षनेते, विधानसभा

देवेंद्र फडणवीस

नागपूर – पाकिस्तानपुरस्कृत अतिरेकी संघटना ‘जैश-ए-महंमद’कडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाची रेकी करण्याचा प्रकार अतिशय गंभीर आणि धक्कादायक आहे. याची माहिती केंद्रीय अन्वेषण यंत्रणेला मिळाली आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे पोलीस आणि केंद्रीय अन्वेषण यंत्रणा योग्य ती काळजी घेतील. हा प्रकार गांभीर्याने घ्यायला हवा, असे वक्तव्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले.