बुद्धीप्रामाण्यवाद्यांची मर्यादा !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार 

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘आंधळा म्हणतो, ‘दृश्य जग असे काही नाही.’ त्याचप्रमाणे अंधश्रद्धा निर्मूलन समितीवाले आणि बुद्धीप्रामाण्यवादी म्हणतात, ‘सूक्ष्म जग’, भूते इत्यादी काही नाही’; कारण त्यांना सूक्ष्मातील विषय समजून घेण्याची जिज्ञासा नसते आणि त्यांच्यात सूक्ष्म जग अनुभवण्यासाठी जी साधना करावी लागते, ती करण्याची क्षमता नसते !’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.