ठाणे, महाराष्ट्र्र येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. प्रदीप चिटणीस यांनी उपशास्त्रीय संगीत गातांना उपस्थित साधकांना आलेल्या त्रासदायक अन् चांगल्या अनुभूती
‘२३ ते २५.११.२०२१ या कालावधीत ठाणे, महाराष्ट्र येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे गायक श्री. प्रदीप चिटणीस यांनी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीत सादर केले. श्री. प्रदीप चिटणीस यांनी शास्त्रीय संगीतात ‘अलंकार’ पदवी प्राप्त केली आहे. त्या वेळी या प्रयोगात उपस्थित असलेल्या काही साधकांना उपशास्त्रीय संगीत ऐकतांना आलेल्या त्रासदायक आणि चांगल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
१. होरी (बोल : होरी खेले नंदलाल ब्रीजमें, संग लिए अपने कई ग्वालबाल रे)
संगीतातील या प्रकारात होलिकोत्सवाच्या समयी रंग खेळतांना राधा-कृष्ण यांच्या शृंगारलीलांची वर्णने असणारी काव्यरचना असते. त्यामुळे ‘होरी’, ‘अबीर’, ‘गुलाल’ इत्यादी शब्द ‘होरी’ या काव्य प्रकारात आढळतात. हा गायन प्रकार प्रामुख्याने उत्तर भारतात गायला जातो.
१ अ. कु. मयुरी आगवणे
१. ‘श्री. चिटणीसकाका ‘होरी’ म्हणत असतांना ते श्रीकृष्णाच्या समवेत होळी खेळत आहेत’, असे मला वाटले. त्यांनी गाण्याच्या माध्यमातून तो प्रसंग उभा केल्याने मीही शब्दांशी एकरूप झाले होते.
२. माझ्या अनाहतचक्राजवळ थंडावा जाणवला. ‘माझे हात आणि तळपाय यांतून थंड लहरी बाहेर पडत आहेत’, असे मला जाणवले.’
१ आ. कु. म्रिणालिनी देवघरे
१. ‘हा गायन प्रकार चालू करण्यापूर्वी काकांचा तोंडवळा लाल झाला होता. काही वेळाने माझा श्रीकृष्णाचा नामजप चालू झाला.’
१ इ. श्री. मनोज सहस्रबुद्धे (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के)
१. ‘काकांचे गायन चालू झाल्यावर काही वेळानंतर मला गायनातील चैतन्याची जाणीव होऊ लागली. राधा-कृष्ण आणि सर्व गोप-गोपी यांच्यातील रंगांची उधळण आमच्यासमोर होत असल्यासारखे मला जाणवत होते.’
१ ई. एक साधिका
१ ई १. त्रासदायक अनुभूती
अ. ‘काका ‘होरी’ गात असतांना मला पुष्कळ त्रास होत होता आणि ‘प्रयोग सोडून निघून जावे’, असे वाटत होते. त्या वेळी मला उदासीन वाटत होते.
आ. काकांच्या भावपूर्ण गायनाने मला अनाहतचक्रावर त्रासदायक संवेदना जाणवत होत्या.
१ ई २. चांगली अनुभूती
अ. होरी हा प्रकार भगवान श्रीकृष्णावर आधारित आहे. त्यामुळे मला आरंभी डोळ्यांसमोर बालकृष्णाचे रूप दिसले. त्या वेळी मला चांगले वाटत होते.’
२. कजरी (बोल : सावन की ऋत आयी री सजनिया)
श्रावण मास आणि वर्षाऋतु यांचे वर्णन असलेली शृंगाररसयुक्त गीते या प्रकारात येतात.
२ अ. कु. मयुरी आगवणे
२ अ १. त्रासदायक अनुभूती
अ. ‘कजरी’ हा प्रकार ऐकत असतांना माझे मन एकाग्र होत नव्हते आणि मला ग्लानी येत होती.
२ अ २. चांगली अनुभूती
अ. ‘काका आर्ततेने आणि भावपूर्ण गात आहेत’, असे मला वाटले.’
२ आ. श्री. मनोज सहस्रबुद्धे (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के)
१. ‘काही वेळा माझ्या डोळ्यांसमोर ‘एक स्त्री अतिशय आर्ततेने तिच्या सखींना सांगत आहे’, असे दृश्य मला दिसत होते.
२. काही वेळा माझे ध्यान लागल्याचे जाणवले.’
२ इ. कु. म्रिणालिनी देवघरे
१. ‘बंदिश (शास्त्रीय गायनातील रागाचे स्वरूप स्पष्ट करणारे मध्यलय किंवा द्रुत लयीत गायले जाणारे बोलगीत) चालू असतांना माझे डोळे सहजतेने बंद झाले. त्या वेळी मला दिसले, ‘एक स्त्री कथ्थक नृत्य करत आहे. तिने घागरा घातला आहे आणि तिच्या तोंडवळ्यावर चिंतेच्या भावना आहेत.’
२. मला अनाहतचक्रावर संवेदना जाणवल्या.’
३. चतरंग (बोल : ‘जय जय जय आदिदेव, शंकर महाकालेश्वर, आशुतोष गंगाधर नीलकंठ’)
चतरंग म्हणजे ज्या गीतात चार प्रकारचे रंग, म्हणजेच गीतप्रकार एकत्रित केलेले असतात, असे गीत. यात ‘छोटा ख्याल, सरगमगीत, तराणा आणि त्रिवट’ हे गीतप्रकार एकत्रित केलेले असतात.
३ अ. कु. मयुरी आगवणे
१. ‘मला २ – ३ वेळा विभूतीचा सुगंध आला.’
३ आ. श्री. मनोज सहस्रबुद्धे (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के)
१. ‘माझ्या मनाला आलेली मरगळ दूर होऊन मला माझ्यात वीररसाची उत्पत्ती झाल्याचे जाणवले.
२. काका तबल्याचे बोल म्हणत असतांना ‘साक्षात् कैलासाधिपती शंकर डमरू वाजवत तांडव नृत्य करत आहे’, असा मला जाणवत होते.
३. मला पृथ्वीतत्त्व आणि आकाशतत्त्व यांचे प्रमाण अधिक प्रमाणात जाणवत होते.
४. मला शक्तीची स्पंदने जाणवत होती.’
३ इ. एक साधिका
३ इ १. त्रासदायक अनुभूती
अ. ‘चतरंग’ या गायन प्रकारात काकांनी शंकरा रागाचे स्वर आळवायला चालू केल्यावर मला अनाहतचक्रावर त्रासदायक संवेदना जाणवल्या. या प्रकारात शक्ती जाणवत होती.
३ इ २. चांगल्या अनुभूती
अ. ‘काका शंकरा राग गातांना मला शंकराचे अस्तित्व जाणवत होते.
आ. काही वेळाने काकांचे गायन ऐकून मला उत्साह वाटू लागला आणि मला ऊर्जा मिळाल्यासारखे जाणवले.’
४. ठुमरी
४ अ. मयुरी आगावणे
४ अ १. ‘ठुमरी’ हा प्रकार ऐकतांना मला पुष्कळ ग्लानी येत होती.’
(क्रमशः पुढच्या गुरुवारी)
(सर्व सूत्रांचा दिनांक १७.१२.२०२१)
– सौ. अनघा जोशी, बी.ए. (संगीत) (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.
‘संगीतातील उपशास्त्रीय प्रकारांचा अभ्यास करायला हवा’, असे वाटणे आणि ‘२ दिवसांनी श्री. चिटणीसकाका यांचे उपशास्त्रीय गायनाचे प्रयोग आहेत’, हे समजल्यावर देवाने हा अभ्यास करण्याची संधी दिल्यामुळे कृतज्ञता वाटणे
‘प्रयोगाच्या २ दिवसांपूर्वी देवाने सुचवले, ‘आतापर्यंत ‘बडा ख्याल’ (शास्त्रीय गायनातील रागाचे स्वरूप स्पष्ट करणारे संथलयीत गायले जाणारे बोलगीत) आणि ‘छोटा ख्याल’ (शास्त्रीय गायनातील रागाचे स्वरूप स्पष्ट करणारे मध्यलय किंवा द्रुत लयीत गायले जाणारे बोलगीत) ऐकून काय जाणवते ?’, याचा थोडाफार अभ्यास झाला आहे. आता संगीतातील ‘कजरी’, ‘होरी’, ‘ठुमरी’ इत्यादींचा अभ्यास करायला हवा.’ मी त्याविषयी उत्तरदायी साधिकेला सांगितले. त्यानंतर २ दिवसांनी श्री. चिटणीसकाकांच्या माध्यमातून ‘होरी’, ‘कजरी’ इत्यादी उपशास्त्रीय प्रकारांचा अभ्यास करायला मिळाला. त्यासाठी माझी देवाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.’
– सौ. भक्ती कुलकर्णी, रामनाथी, गोवा. (१७.१२.२०२१)
|