सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्यावर त्रास दूर झाल्याच्या आलेल्या अनुभूती !

श्री. प्रताप कापडिया

लेखक : श्री. प्रताप कापडिया, फोंडा, गोवा.

१. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्यावर एक घंट्यात रक्तातील प्राणवायूचे प्रमाण वाढणे : ‘सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ मला प्रतिदिन नामजपादी उपाय शोधून देत होते. माझ्या रक्तातील प्राणवायूचे प्रमाण न्यून झाल्यावर सद्गुरु काका मला नामजपादी उपाय सांगायचे. त्यांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्यावर एक घंट्यात रक्तातील प्राणवायूचे प्रमाण वाढायचे.

२. शौचाला न होणे आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्यावर तो त्रास दूर होणे : एकदा मला शौचाला होत नव्हते. त्यासाठी जोर दिल्यास हृदयावर परिणाम होऊ शकतो; म्हणून आधुनिक वैद्यांनी मला ‘तसे करून नका’, असे सांगितले. सद्गुरु काकांनी त्यासाठीही मला जप दिला. तो जप केल्याने माझा त्रास दूर झाला. त्यांनी सांगितलेल्या नामजपादी उपायांमुळे मला पुष्कळ लाभ झाला. सद्गुरु काकांमुळे मी बरा झालो. त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

कु. भाविनी कपाडिया

लेखिका : कु. भाविनी कापडिया (श्री. प्रताप कापडिया यांची मुलगी, आध्यात्मिक पातळी ६६ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितल्याप्रमाणे नामजपादी उपाय केल्यावर देवता वडिलांजवळ सूक्ष्मातून उपस्थित असल्याचे जाणवणे आणि त्यानंतर वडिलांना ‘व्हेंटिलेटर’ लावावा न लागणे : ‘बाबांना अतीदक्षता विभागात नेल्यावर त्यांना ‘व्हेंटिलेटर’ (रुग्णाला कृत्रिम श्वासोच्छ्वास करण्यास साहाय्य करणारे साधन) लावू शकतात, असे कळले. तेव्हा आम्ही सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना नामजपादी उपाय विचारले. त्या वेळी सद्गुरु काकांनी आम्हाला सांगितले, ‘‘कोरोना’ प्रतिबंधक नामजप चालू ठेवा आणि श्री दुर्गादेवी, दत्त अन् शिव या देवतांना प्रार्थना करा. आता प्रार्थनेनेच अधिकाधिक लाभ होईल.’’ आम्ही त्याप्रमाणे केल्यावर आम्हाला त्या देवता बाबांजवळ सूक्ष्मातून उपस्थित असल्याचे जाणवले. त्यानंतर १ घंट्याने उज्ज्वलने आम्हाला भ्रमणभाषवर संदेश पाठवला, ‘बाबांना ‘व्हेंटिलेटर’ न लावता ‘एन्.आर्.बी.एम्.’ मास्क लावला आहे.’ देवाच्या कृपेने आणि सद्गुरु गाडगीळकाकांनी सांगितलेल्या नामजपादी उपायांमुळे बाबांना ‘व्हेंटिलेटर’ लावण्याची वेळ आली नाही.’

(सर्व सूत्रांचा दिनांक : ८.५.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक