गलवान खोर्‍यामध्ये आता भारतीय सैन्याने राष्ट्रध्वज फडकावत चिनी सैन्याला दिले प्रत्युत्तर !

गलवान खोर्‍यामध्ये भारतीय राष्ट्रध्वज फडकावताना भारतीय सैन्य

नवी देहली – चिनी सैन्याने १ जानेवारी या दिवशी लडाखमधील गलवान खोर्‍यामध्ये चिनी राष्ट्रध्वज फडकावल्याचा व्हिडिओ प्रसारित केल्यावर केंद्र सरकारवर टीका करण्यात आली होती. त्यावर भारतीय सैन्याने स्पष्टीकरण देतांना चीनने त्याच्या नियंत्रणातील भागामध्ये हा ध्वज फडकावण्यात आल्याचे म्हटले होते. आता भारतीय सैन्यानेही चिनी सैन्याला प्रत्युत्तर देतांना गलवान खोर्‍यामध्ये भारतीय राष्ट्रध्वज फडकावला आहे.