लोकायुक्तांना चौकशी करण्याचे राज्यपालांचे आदेश !
मुंबई, २ जानेवारी (वार्ता.) – मुंबई महापालिकेच्या आश्रय योजनेत १ सहस्र ८४४ कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे, असा आरोप भाजपचे आमदार मिहीर कोटेचा आणि काही नगरसेवक यांनी केला आहे. त्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आश्रय योजनेतील झालेल्या अपव्यवहाराची चौकशी करावी, असा आदेश लोकायुक्तांना दिला आहे. यापूर्वी परिवहन विभागातील पदोन्नतीसाठी लाखो रुपयांची वसुली केल्याची तक्रार भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी राज्यपालांकडे केली होती. त्यानुसार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश लोकायुक्तांना दिले होते.
Probe Rs 1,844 crore BMC quarters ‘scam’: Maharashtra governor to Lokayukta https://t.co/1g9gQdfmRo
— TOI Mumbai (@TOIMumbai) January 2, 2022
काय आहे प्रकरण ?(सौजन्य : Saam TV News) स्वच्छता कामगारांसाठी आश्रय योजनेतून पक्की घरे बांधली जातात. या योजनेच्या माध्यमातून स्वच्छता कामगारांच्या ३९ वसाहतींचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. या योजनेत आतापर्यंत मुंबई महापालिकेने १ सहस्र ८४४ कोटी रुपयांचा प्रस्ताव संमत केला आहे. या प्रस्तावावर भाजपने आक्षेप नोंदवला होता; मात्र त्यानंतरही प्रस्ताव संमत झाल्यानंतर भाजपचे स्थायी समितीचे सदस्य विनोद मिश्रा यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. या तक्रारीची नोंद घेऊन राज्यपालांनी वरील आदेश दिले. |