६४ टक्के आध्यात्मिक पातळीचे देवगड (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील श्री. शेखर इचलकरंजीकर यांनी श्रीकृष्णाच्या चित्राला वाहिलेले कमळपुष्प २५ घंटे टवटवीत रहाणे
‘४.९.२०१९ या दिवशी सकाळी ८ वाजता मी भगवान श्रीकृष्णाच्या सनातन-निर्मित चित्राला कमळाचे फूल वाहिले. ते फूल ५.९.२०१९ या दिवशी सकाळी ९ वाजेपर्यंत टवटवीत होते.’
– श्री. शेखर इचलकरंजीकर (वय ७३ वर्षे), देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. (१६.९.२०१९)
‘सामान्यतः पाण्यातील कमळाचे फूल २४ घंटे टवटवीत रहाते ! या ठिकाणी साधकाने देवतेला वाहिलेले फूल २५ घंटे टवटवीत राहिले, हे वैशिष्ट्यपूर्ण आहे ! देवतेला वहाण्यापूर्वीही ते फूल पाण्यातून काढून काही काळ निश्चितच झाला असेल ! साधकांच्या भक्तीभावाला देव कशा प्रकारे प्रतिसाद देतो, याचे हे उदाहरण आहे !’
– डॉ. अजय जोशी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२९.१२.२०२१)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |