केरळमधील मंत्र्याच्या कार्यालयातील प्रसाधनगृहाच्या बांधकामावर ४ लाख रुपये व्यय करण्यास साम्यवादी सरकारची संमती !

जनतेच्या पैशांची लूट करणारे साम्यवादी सरकार ! असा पक्ष सत्तेवर असल्यास जनहित काय साधले जाणार ? – संपादक

केरळ राज्याचे मत्स्योद्योग मंत्री साजी चेरियन

कोच्ची – केरळ राज्याचे मत्स्योद्योग मंत्री साजी चेरियन यांच्या कार्यालयातील प्रसाधनगृहाच्या बांधकामावर ४ लाख १० सहस्र रुपये व्यय करण्यात आले आहेत. सामान्य प्रशासन खात्याकडून वरील माहिती उघड झाल्यावर सर्वत्र टीकेची झोड उठली आहे. विशेष म्हणजे केरळ सरकारच्या घरकुल योजनेच्या अंतर्गत गरिबांना घर बांधकामासाठी ४ लाख रुपये संमत केले जातात आणि मंत्र्यांच्या कार्यालयातील प्रसाधनगृहाचा व्यय मात्र घरकुलांच्या व्ययापेक्षा अधिक असल्याने सर्वत्र आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. (गरिबांना घर बांधण्यासाठी ४ लाख रुपये, तर मंत्र्यांना प्रसाधनगृह बांधण्यासाठी ४ लाख १० सहस्र रुपये संमत करणे, हाच साम्यवादी सरकारचा साम्यवाद का ? – संपादक) केरळ राज्य सध्याच्या घडीला आर्थिक संकटातून जात असताना मंत्र्याच्या कार्यालयातील प्रसाधनगृहावर एवढा खर्च केल्याने याविषयीची चर्चा होत आहे.