मुंबई – १७ अवैध ‘ऑनलाईन’ लॉटरी चालवणार्या ५ जणांच्या टोळीला पोलिसांनी दादर येथून अटक केली आहे. आंचल चौरसिया, त्याचे वडील रमेश चौरसिया, रविकुमार घोशिकुडा, मनमोहनसिंह शेखावर, कमलेश सांकला, कौशल पांडे, राजा मुन्ना यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी आंचलसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. अन्य फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. या लॉटरीद्वारे सरकारचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवण्यात आला आहे. ‘गेम किंग’ नावाने वर्ष २०१८ मध्ये १५ देशांत अवैध ऑनलाईन लॉटरी चालवल्याप्रकरणी आंचल चौरसिया याला अटक झाली होती. या आरोपीवर वर्ष २०१४ पासून १९ गुन्हे नोंद आहेत. (इतके गुन्हे नोंद असणार्यावर आतापर्यंत कठोर कारवाई झाली असती, तर पुन्हा त्याने अवैधरित्या ऑनलाईन लॉटरी चालवण्याचे धाडस केले नसते ! – संपादक)